नवी दिल्ली, 11 जून : एकिकडे भारतीय कोरोना लस (Corona vaccine) कोवॅक्सिनला (Covaxin) अमेरिकेने (America Covaxin) त्यांच्या देशात परवानगी नाकारली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाच्या काही तासांतच मोदी सरकारनेही कोवॅक्सिन लशीबाबत मोठी माहिती दिली आहे. कोवॅक्सिन लशीच्या ट्रायलबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत भारताने तयार केलेल्या कोवॅक्सिन लशीचाही उल्लेख केला. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निकाल पुढील सात ते आठ दिवसात येण्याची शक्यता आहे, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.
We expect that our manufacturers will be able to comply with it. It has no impact on our own program. Our regulator has approved it.We have so much data on safety & phase 3 trial. I'm being told that publication of their phase 3 trial will be done sometime in 7-8 days: Dr VK Paul
— ANI (@ANI) June 11, 2021
सरकारने ही अपडेट अमेरिकेने भारतीय लशीला परवानगी नाकारल्यानंतर काही तासांतच दिली आहे. हे वाचा - अरे देवा! कोरोनानंतर आता Monkeypox; किती खतरनाक आहे हा व्हायरस पाहा हैदराबादमधील भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीकडून उत्पादित केली जाणारी ही लस. भारतात या लशीला आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आलेली आहे. सध्या कोरोना लसीकरण मोहिमेत ही लस दिली जात आहे. अमेरिकेतही या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागण्यात आली होती. भारत बायोटेकने अमेरिकेतील भागीदार ऑक्यूजेन कंपनीच्या माध्यमातून ‘एफडीए’कडे कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मंजुरी मागितली होती. मात्र ‘एफडीए’ने कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली नाही. हे वाचा - देशातील शास्त्रज्ञानं बनवलं पॉकेट व्हेंटिलेटर, कोरोना लढ्यात ठरणार महत्त्वपूर्ण ‘एफडीए’ कोव्हॅक्सिन लशीचं आणखी एकदा परीक्षण करण्यास सांगितलं आहे. यानंतरच अमेरिकेत पूर्ण वापरासाठी मंजुरी मागितली जाईल, असे ऑक्युजेनकडून सांगण्यात आलं आहे. आपत्कालीन वापराच्या परवानगीला नकार देताना अमेरिकेच्या एफडीने एक वेगळा मार्ग सुचवला आहे. त्यामुळे आता भारत बायोटेकची अमेरिकेतील सहकारी कंपनी ऑक्युजेन एफडीएच्या सल्ल्यानुसार बीएलएकडे अर्ज दाखल करणार आहे. या संस्थेकडून लशीच्या वापराला मंजुरी देण्यात येते. त्यामुळे पुढील आणखी काही काळ भारत बायोटेकला मंजुरीसाठी वाट पाहावी लागणार आहे.