• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • अमानवीय! शेतकऱ्याच्या मृतदेहाला कचऱ्याच्या गाडीत फेकलं आणि...

अमानवीय! शेतकऱ्याच्या मृतदेहाला कचऱ्याच्या गाडीत फेकलं आणि...

कोरोना काळात अनेक धक्कादायक फोटो समोर आले आहे. हा फोटो माणुसकीला काळीमा फासणारा असा आहे.

 • Share this:
  लखनऊ, 30 मे : कोरोना महासाथीमुळे (Coronavirus) इतकी भीषण परिस्थिती उद्भवली आहे की, कठीण परिस्थितीत कुटुंबीयही साथ देत नाहीत. कोरोनामुळे मृत्यू झाला तरी मृतदेहाला खांदा देण्यासाठीदेखील कुटुंबीय येत नाही. ही परिस्थिती खरंच लज्जास्पद आहे. मात्र कोरोना योद्धे पोलीस अधिकारीदेखील असं करू लागले तर काय होईल? उत्तर प्रदेशात (Uttar pradesh) महोबातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यासाठी दुसरं वाहन न मिळाल्यानं पोलिसांनी कचऱ्याच्या गाडीचा वापर केला. कचऱ्याच्या गाडीत मृतदेह टाकून तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. ही अत्यंत लज्जास्पद बाब असून प्रशासनाच्या जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माणुसकी नसली तरी काही नियम असतील ज्याचं पालन करणं गरजेचं आहे. मात्र महोबामध्ये सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत. आणि मृतदेहाला कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांप्रमाणे फेकून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. (The farmers body was thrown in the garbage truck ) हे ही वाचा-कोरोनामुळे तडजोड; पैशांसाठी अविवाहित तरुणीसमोर भाडोत्री मातृत्वाचा पर्याय ज्या मृतदेहासोबत अमानवीय प्रकार करण्यात आला, त्याचं नाव राम करण आहे. ते एक शेतकरी होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात पोहोचताच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली. सब इन्स्पेक्टर आणि दोन शिपाई जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यांचं काम मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविणे हा होता. मात्र रुग्णालयाजवळ कोणतीही गाडी नसल्यामुळे अधिकाऱ्याने मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून नेण्याचं ठरवलं. सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल झाला असून लोक यावर टीका करीत आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published: