उत्तर प्रदेश, 30 मे: उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूमुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. अलिगढमध्ये (Aligarh) विषारी दारू (Hooch Tragedy) प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आताही काही जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. 5 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर आरोपी ऋषी शर्मा आणि मुनिष यांच्या ठावठिकाणा सांगणाऱ्यांना पोलिसांनी 50-50 हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
After visiting the incident site, 6 teams were formed & 6 people have been arrested & case registered against them. We've seized suspected documents. Also, recovered country-made illicit liquor, caps, barcode & 1 vehicle: SSP Kalanidhi Naithani on Aligarh hooch tragedy pic.twitter.com/KMKObROVmX
— ANI UP (@ANINewsUP) May 29, 2021
जिल्हा रुग्णालयात 24 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 15 जण व्हेटिंलेटरवर आहेत. अलिगढमध्ये गुड इवनिंग ब्रांडची दारु प्यायल्यानं ही दुर्घटना घडली आहे. या प्रकरणी एका महिलेसह 6 लोकांना अटक केली आहे.
हेही वाचा- Weather Alert: जाणून घ्या राज्यातल्या पावसासंदर्भातले लेटेस्ट अपडेट्स
पोलिसांच्या पथकांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरोची टीमही अलिगढमध्ये आली होती. या पथकाने रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व लोकांची चौकशी केली. आतापर्यंत या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागातील 5 अधिकारी आणि कर्मचार्यांना निलंबित केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alcohol, Aligarh, Crime, India, Uttar pradesh