नवी दिल्ली, 03 मे : जगभरात सध्या कोरोनाव्हायरसचे (coronavirus) 34 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत आणि 2 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसचं हे थैमान कधी थांबणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. मात्र जोपर्यंत जगातील 70 टक्के लोकसंख्या संक्रमित होत नाही, तोपर्यंत कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवता येणार नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. याआधी भारतात कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ज्ञांनी हर्ड इम्युनिटीची थिएरी दिली आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या मते, भारतातील जवळपास 60 टक्के लोकसंख्येला संक्रमित होऊन व्हायरसविरोधात रोगप्रतिकारक शक्ती विकसित करावी लागेल. आता भारताबाहेरील शास्त्रज्ञांनी हर्ड इन्युनिटीबाबत नव्यानं रिसर्च करण्यात आला आहे. हे वाचा - हातांव्यतिरिक्त घरातील ‘या’ वस्तूही ठेवा स्वच्छ, नाहीतर कोरोनाचे शिकार व्हाल अमेरिकेच्या मिनेसॅटा युनिव्हर्सिटीच्या संसर्गजन्य रोग रिसर्च केंद्राच्या शास्त्रज्ञांनी 300 वर्षांच्या इतिहासातील फ्लूसंबंधी महासाथींचा अभ्यास केला. सीबीएस न्यूज आणि अटलांटा जर्नलमध्ये प्रकाशित वृत्ता नुसार रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, पहिल्या 6 महिन्यांनंतर महासाथीचा दुसरा टप्पा येतो आणि त्यावेळी आजार अधिकच घातक ठरतो. जवळपास 2 वर्षांपर्यंत आणखी टप्पे येतात मात्र त्यांचा प्रभाव फारसा नसतो. महासाथीचा कालावधी दीड ते दोन वर्षांपर्यंत असतो कारण हर्ड इन्युनिटी विकसित होण्यासाठी इतका वेळ लागतो त्यामुळे 70 टक्के लोकांना संक्रमित व्हावं लागेल आणि कोरोनाव्हायरसविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करावी लागेल. सध्या फक्त 34 लाख प्रकरणं आहेत आणि हा लोकसंख्येचा खूप कमी हिस्सा आहे. त्यामुळे या कोरोनाव्हायरसचा प्रसार नैसर्गिकरित्या थांबण्यासाठी प्रक्रियेला 2 वर्षांचा वेळ तर लागेल. हे वाचा - कोरोनामुळे माय लेकरांमध्ये अंतर, एकीच्या बाळाला संसर्ग तर दुसरीकडे आई पॉझिटिव्ह मात्र हर्ड इम्युनिटी विकसित करण्यासाठी आरोग्य व्यवस्थाही मजबूत असायला हवी, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.