जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Covaxin घेणाऱ्यांना परदेशात नाही मिळणार प्रवेश? WHO च्या यादीत समावेश नसल्यानं अडचणी

Covaxin घेणाऱ्यांना परदेशात नाही मिळणार प्रवेश? WHO च्या यादीत समावेश नसल्यानं अडचणी

Covaxin घेणाऱ्यांना परदेशात नाही मिळणार प्रवेश? WHO च्या यादीत समावेश नसल्यानं अडचणी

कॉव्हॅक्सिनची लस (Covaxin) घेणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास (international travel) करणं सध्या अवघड होऊ शकतं. WHOच्या आपात्कालीन यादीत म्हणजेच EUL मध्ये समावेश नसल्यानं ही लस घेणाऱ्यांना इतर देशांमध्ये प्रवेश करण्यात अडचणी येऊ शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

lनवी दिल्ली 22 मे : भारत बायोटेकमध्ये (Bharat Biotech) तयार झालेली कॉव्हॅक्सिनची लस (Covaxin) घेणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास (international travel) करणं सध्या अवघड होऊ शकतं. मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आपात्कालीन यादीत म्हणजेच EUL मध्ये सामील नसल्यानं ही लस घेणाऱ्यांना इतर देशांमध्ये प्रवेश करण्यात अडचणी येऊ शकतात. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवेश धोरणं जाहीर केली आहेत. तर, काही देश लवकरच नवे नियम जाहीर करतील. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अनेक देश अशाच लसींना परवानगी देत आहेत, ज्यांना त्यांच्या नियामकाने मान्यता दिली आहे किंवा डब्ल्यूएचओच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आहे. सध्या या यादीत सीरम इनस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड, मॉडर्ना, फाइजर, एस्ट्राजेनेका (2), जेनसेन आणि सिनोफार्म/बीबीआयपी या लशींचा समावेश आहे. संघटनेनं आतापर्यंत कोव्हॅक्सिनचा EUL मध्ये समावेश केलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, याचा EUL मध्ये समावेश कऱण्यासंदर्भात मे-जूनमध्ये मीटिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. यानंतर या लसीचा समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र, यासाठीच्या कामाला भरपूर वेळ लागू शकतोय टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यावर भारत बायोटेककडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इमिग्रेशन एक्सपर्ट विक्रम श्रॉफ यांचं असं म्हणणं आहे, की जर लसीचा EUL मध्ये समावेश नसेल किंवा विदेशात याला मंजुरी मिळाली नसेल तर अशी लस घेतलेल्या प्रवाशांचं लसीकरण झाल्याचं मान्य केलं जाणार नाही. सध्या भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला परवानगी मिळाली आहे. याशिवाय रशियाच्या स्पूतनिक-V या लशीच्या वापरालाही परवानगी मिळाली आहे. लवकरच ही लस बाजारात योग्य प्रमाणात उपलब्ध होईल, असं म्हटलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात