Home /News /pune /

Coronavirus in Pune: पालकांनो लहान मुलांची काळजी घ्या, पुण्यात सहा दिवसांत तब्बल चौपट लहान मुले कोविड पॉझिटिव्ह

Coronavirus in Pune: पालकांनो लहान मुलांची काळजी घ्या, पुण्यात सहा दिवसांत तब्बल चौपट लहान मुले कोविड पॉझिटिव्ह

Pune Coronavirus news update: गुरुवारी (13 जानेवारी 2022) पुण्यात 5 हजार 571 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.

पुणे, 14 जानेवारी : पुण्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ (Coronavirus spike in Pune) होत आहे. त्यामुळे चिंता वाढली असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती (Shocking information reveals about Pune Covid cases) समोर आली आहे. यावेळी मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही कोरोनाचा संसर्ग (Children infected with covid 19) होत असल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यात लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची संख्या वाढत आहे. गेल्या सहा दिवसांत तब्बल चौपट मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणेकरांनो लहान मुलांची विशेष काळजी घेणं खूपच आवश्यक आहे. पुण्यात सहा दिवसांत चारपट लहान मुले कोरोना बाधित झाल्याचं समोर आलं आहे. मोठयांप्रमाणे लहान मुलांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. बालकांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. 1 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत 0 ते 11 वयोगटातील 2488 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पुणे शहरात 0 ते 10 आणि 11 ते 20 वयोगटातील कोरोनाबधितांची संख्या सहा दिवसात चारपटीने वाढली आहे. वाचा : पुण्यातील बड्या बिल्डरला अजितदादांच्या पीएच्या नावानं धमकीचा फोन, मागितले 20 लाख लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली आहे. डॉक्टरांकडून लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मुलांना सर्दी, ताप, खोकला असेल तर चाचणी करुन घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. पुण्यातील कोरोनाची स्थिती पुणे शहरात गुरुवारी (13 जानेवारी) दिवसभरात तब्बल 5 हजार 571 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी दोन रुग्ण हे पुण्यातील होते. तर एक रुग्ण पुण्याबाहेर होता. पुण्यात सध्या 182 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 19 रुग्ण आहेत. तसेच नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 26 रुग्ण आहेत. पुण्यात गुरुवारी 2 हजार 335 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 5 लाख 42 हजार 989 इतकी आहे. तर 25 हजार 737 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी एक सामाधानाची बाब म्हणजे सक्रिय रुग्णांपैकी केवळ 4.33 टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुण्यात 12 जानेवारी रोजी दिवसभरात 4 हजार 857 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर 1 हजार 805 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. तसेच एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली होती. पुण्यात बुधवारी दिवसभरात 33 रुग्ण गंभीर असल्याची माहिती महापालिकेकडून जारी करण्यात आली होती. पण आज हाच आकडा थेट 45 वर पोहोचला आहे. गंभीर रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांच्याकडून शर्तीने प्रयत्न सुरु आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, Pune

पुढील बातम्या