मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार नुकसान भरपाई

Corona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार नुकसान भरपाई

लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला काही नुकसान पोहोचले तर त्याची भरपाई (Compensation) कंपनी देणार आहे.

लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला काही नुकसान पोहोचले तर त्याची भरपाई (Compensation) कंपनी देणार आहे.

लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला काही नुकसान पोहोचले तर त्याची भरपाई (Compensation) कंपनी देणार आहे.

नवी दिल्ली, 16 जानेवारी : देशात आजपासून कोरोना लसीकरणाची सुरुवात होत असून लसीकरणाची पूर्ण तयारी झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकने (Bharat Biotech) महत्वाची घोषणा केली गेली आहे. त्यानुसार लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला काही नुकसान पोहोचले तर त्याची भरपाई (Compensation) कंपनी देणार आहे. देशात सध्या सिरम इन्स्टिट्यूट (SII) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) यांच्या कोरोना लसीला परवानगी दिली गेली आहे. लसीकरणाची सुरुवात फ्रंटलाईनवरील 3 कोटी  आरोग्य आणि संरक्षण कर्मचाऱ्यांना लस देऊन होणार आहे.

परंतु भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन(Covaxin) या लसीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. यासाठी कंपनीने आपल्या फॉर्ममध्ये एक विशेष रकाना ठेवला असून यामध्ये तुम्हाला लक्षणांची नोंद करावी लागणार आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार लस घेणाऱ्या व्यक्तीला याचे दुष्परिणाम जाणवल्यास सरकारच्या अधिकृत रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येणार आहेत.  कंपनीने त्यांच्या कंसेंट फॉर्ममध्ये यासंबंधी स्पष्ट माहिती दिली असून त्यांच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झालेली नाही. आज मुंबईमध्ये 6 केंद्रावर कोवॅक्सीन(Covaxin) ही लस दिली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रासह भारतातील 11 राज्यांनी कोवॅक्सीन स्वीकारली असून या राज्यांमध्ये सिरमच्या लसीबरोबर भारत बायोटेकची लस देखील दिली जाणार आहे. ज्या व्यक्तीला लस दिली जाणार आहे त्या व्यक्तीला एक फॅक्ट शीट आणि एक दुष्परिणाम लिहिलेली शीट दिली जाणार आहे. यामध्ये लस घेतलेल्या व्यक्तीला या फॉर्ममध्ये पहिल्या 7 दिवसात दिसणारी लक्षणे लिहावी लागतील. कंपनीने आपल्या कन्सेंट फॉर्ममध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये ही लस घेतल्यानंतर अँटीबॉडी(Antibody) तयार होत असल्याचे सांगण्यात आले आहे. याचबरोबर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण न झाल्याने ही लस किती टक्के प्रभावी आहे याची कंपनीकडून घोषणा करण्यात आलेली नाही.

हे ही वाचा-आता इच्छा नाहीये...' पंतप्रधानांनी सुरू केलेल्या लसीकरणाला महिला डॉक्टरचा नकार

सीरम इन्स्टिट्यूट (Serum institute) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) या दोन्ही कंपन्या नुकसानभरपाई देण्यास जबाबदार असतील असे न्यूज 18 ला विश्वसनीय सूत्रांकडून कळाले आहे. केंद्र सरकारने लस खरेदी करताना कंपन्यांकडून तसे लिहून घेतल्याचे देखील सामोरं आलं आहे. यासंबंधी बोलताना भारत बायोटेकचे चेअरमन डॉक्टर कृष्णा ऐल्ला (krishna Ella) यांना याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी भारतीय वैज्ञानिकांना टार्गेट करणे सोपे असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या कंपनीने आमच्या कंपनीच्या लसीला पाण्यासारखे साफ म्हटल्याने यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.आम्ही वैज्ञानिक 24 तास काम करत असून नागरिकांनी अशा पद्धतीने आमच्यावर टीका केल्यास किंवा शंका घेतल्यास आम्हाला त्रास होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. केवळ तीन कंपन्यांनी आपल्या कंपनीची लस किती टक्के प्रभावी आहे हे सांगितली आहे. त्यामुळे मी या गोष्ट नाकारतो. यामुळे आता या लसीकरणानंतर कोवॅक्सीनचे(Covaxin) काय दुष्परिणाम समोर येतात कि ती सुरक्षित आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Corona virus in india