मुंबई, 6 जानेवारी : क्रिकेट विश्वात लवकरच महिला टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. 10 फेब्रुवारी पासून दक्षिण आफ्रिकेत महिला वर्ल्ड कपला प्रारंभ होणार असून यात भारताचा पहिलाच सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होईल. त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा क्रिकेटच्या मैदानात नमवण्याचा मौका भारताकडे असणार आहे. 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान महिला टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार असून याचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धेत 10 संघांचा सहभाग असून यांचे दोन ग्रुपमध्ये विभाजन करण्यात आले आहे. ग्रुप A मध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेश आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. तर ग्रुप B मध्ये भारत, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्टइंडीज हे संघ आहेत. हे ही वाचा : भारताच्या बॅडमिंटनपटूला इराणमध्ये हिजाब घालण्याची सक्ती भारतीय संघ ग्रुप स्टेजमध्ये 4 सामने खेळणार असून 12 फेब्रुवारी रोजी भारताचा पहिलाच सामना हा पाकिस्तान सोबत असेल. केपटाऊनमधील न्यूलँड्स ग्राऊंड, पार्लमधील बोलँड पार्क आणि पोर्ट एलिझाबेथमधील सेंट जॉर्ज पार्क या तीन मैदानांवर हे सामने खेळवले जातील. ग्रुप स्टेजमधील सामने झाल्यानंतर दोन्ही ग्रुप मधील पहिल्या दोन संघांमध्ये सेमी फायनल राऊंड खेळला जाईल. पहिला सेमी फायनल हा 23 फेब्रुवारीला तर दुसरा सेमी फायनल सामना हा 24 फेब्रुवारीला होईल. तर २६ फेब्रुवारी रोजी अंतिम सामना खेळवला जाईल.
कधी होणार सामने : भारत ग्रुप स्टेज मध्ये 4 सामने खेळणार असून पहिला सामना 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान सोबत, दुसरा सामना 15 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज बरोबर होणार आहे. तर तिसरा सामना 18 फेब्रुवारीला इंग्लड आणि चौथा सामना 20 फेब्रुवारी रोजी आयर्लंड सोबत होईल. महिला टी 20 वर्ल्ड कपच्या सामन्यांना सायंकाळी 6:30 वाजता सुरुवात होईल. कुठे पाहाल सामने : भारतात महिला टी 20 वर्ल्डकप 2023 चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. याचबरोबर हे सामना डिझनी+हॉटस्टारवर देखील लाईव्ह पाहता येतील. हे ही वाचा : ‘तेरा हिरो इधर है’ म्हणतं शुभमन गिलने टिंडरवर सुरु केलं अकाउंट भारताचा टी २० महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.