जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Corona Vaccine : लसीकरणानंतर ‘या’ देशात 23 जणांचा मृत्यू, जगाला दिला इशारा!

Corona Vaccine : लसीकरणानंतर ‘या’ देशात 23 जणांचा मृत्यू, जगाला दिला इशारा!

Corona Vaccine : लसीकरणानंतर ‘या’ देशात 23 जणांचा मृत्यू, जगाला दिला इशारा!

जगातील अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम यापूर्वीच सुरु झाली आहे. या कोरोना लसीकरणानंतर हा व्हायरस (virus) आटोक्यात येईल अशी सर्व देशांना आशा आहे. त्याचवेळी एक काळजीचा प्रकार उघड झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ओस्लो, (नॉर्वे), 16 जानेवारी :  देशभर आजपासून लसीकरण (Corona Vaccination) मोहीम सुरु होत आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम यापूर्वीच सुरु झाली आहे.  कोरोना लशीकरणानंतर हा व्हायरस (virus) आटोक्यात येईल अशी सर्व देशांना आशा आहे. त्याचवेळी एक काळजीचा प्रकार उघड झाला आहे. कोरोना लस (Corona Vaccine) दिल्यानंतर आपल्या देशातील 23 जणांचा मृत्यू झाला असा दावा युरोपातील नॉर्वे (Norway)  या देशानं केला आहे. नॉर्वेमध्ये आजवर 33 हजार जणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. या लसीकरणांनंतर मृत्यूमुखी पावलेल्या व्यक्तींमध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे. यामध्ये अनेकांचं वय हे 80 पेक्षा अधिक आहे. नॉर्वे सरकारचा इशारा ‘कोरोना लस वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरु शकते’ असा इशारा नॉर्वे सरकारनं दिला आहे. यामध्ये मृत्यूमुखी पावलेल्या 23 पैकी 13 जणांचं शवविच्छेदन (autopsy) करण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या शरिरावर लशीचे दुष्परिणाम झाल्याचं आढळून आलं आहे. ‘गंभीर आजारी लोकांसाठी लशीकरणानंतरचे सामान्य साईड इफेक्टही धोकादायक ठरु शकतात. ज्यांचं आयुष्य अगदी थोडं उरलं आहे, त्यांना या लशीचा कमी फायदा मिळू शकतो,’’ असा दावा नॉर्वेजियन इंस्टीट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेनं केला आहे. ‘लसीकरण आवश्यकच’ लसीकरणाचे दुष्परिणाम समोर आल्यानंतरही ही मोहीम थांबवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. तरुण आणि निरोगी नागरिकांनी स्वत:ला लस टोचवून घेणं आवश्यक आहे, असं सरकारनं स्पष्ट केलं. “नॉर्वेमधून प्राथमिक माहिती समोर आली आहे. याची सर्व देशांनी गांभीर्यानं दखल घेणं आवश्यक आहे’’, असं मत युरोपियन मेडिसीन एजन्सीचे प्रमुख एमर कुक यांनी व्यक्त केलं आहे. कोरोना लसीच्या सुरक्षेवरही त्यांनी यावेळी भर दिला. भारतात लसीकरणाला सुरुवात संपूर्ण देशभरात आजपासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच आज लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, जालना, नागपूरसह इतर भागात लसीकरण केले जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात