नवी दिल्ली 01 मार्च : कोरोनाचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला 1 मार्चपासूव सुरुवात झाली आहे. सकाळी 9 वाजतापासून रजिस्ट्रेशनची (CoWIN Registration) प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र, अनेक लोकांना अजूनही कोरोना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन किंवा नाव नोंदणी कुठे करायची याबद्दलची माहिती नाही. अशात लोकांमध्ये निर्माण झालेला हा गोंधळ लक्षात घेता आरोग्य मंत्रालयानं आता याबद्दलची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे, की CoWIN चं कोणतंही मोबाईल अॅप नाही. लसीकरणासाठी इच्छुक लोकांनी cowin.gov.in या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. कोणत्याही अॅपवर नाही. प्ले स्टोरवर असणारं अॅप हे केवळ अॅडमिनिस्ट्रेटर्ससाठी आहे. कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी CoWIN एकमेव पर्याय नाही. ज्या लोकांकडे स्मार्ट फोन नाही असे लोक थेट जवळ्या सेंटरमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात. केवळ रजिस्ट्रेशसाठी जाताना आवश्यक कागदपत्रं सोबत ठेवणं गरजेचं आहे. याबद्दलची अधिक माहिती 1507 या नंबरवर कॉल करून आपण मिळवू शकता.
#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) March 1, 2021
Registration and booking for appointment for #COVID19 Vaccination is to be done through #CoWIN Portal: https://t.co/4VNaXj35GR.
There is NO #CoWIN App for beneficiary registration. The App on Play Store is for administrators only. pic.twitter.com/ifAmoEG3P2
पोर्टलवर असं करा रजिस्ट्रेशन - कोरोना लसीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असल्यास www.cowin.gov.in पोर्टलवर जात रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर याठिकाणी नोंदवायचा आहे. यावर वन टाईम पासवर्ड येईल. याच ओटीपीच्या आधारे आपण आपलं अकाऊंट क्रिएट करू शकतो. यानंतर तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग, पत्ता याबद्दलची माहिती भरायची आहे. 45 ते 59 वर्ष वय असणाऱ्या गंभीर आजार असणाऱ्या लोकांना कॉमरेडिटी प्रमाणपत्रही द्यावं लागेल. लस कधी आणि कुठे घ्यायची याची निवड आपण स्वतःही करू शकता. एका मोबाईल नंबरवर 4 लोकांची नोंदणी केली जाऊ शकते. अधिक माहितीसाठी आपण 1507 या नंबरवर संपर्क साधू शकता.

)







