Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाबाधित आसारामनं केली आयुर्वेदिक उपचाराची मागणी, न्यायालयात आज सुनावणी

कोरोनाबाधित आसारामनं केली आयुर्वेदिक उपचाराची मागणी, न्यायालयात आज सुनावणी

आसारामला कोरोनाची लागण (Asaram Corona infected) झाली आहे. यादरम्यान त्याची प्रकृती खालावत असल्याचं समोर आलं आहे. अशात उच्च न्यायालयात आसारामनं दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

    जोधपूर 21 मे : आसारामला कोरोनाची लागण (Asaram Corona infected) झाली आहे. यादरम्यान त्याची प्रकृती खालावत असल्याचं समोर आलं आहे. अशात उच्च न्यायालयात आसारामनं दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती देवेंद्र कच्छवाह यांचं खंडपीठ यावर सुनावणी करणार आहे. उच्च न्यायालयात आसारामनं आयुर्वेदिक उपचारांसाठी (Ayurveda cure) परवानगी मागितली आहे. आसाराम सध्या जोधपूर एम्समध्ये दाखल आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी आसारामच्या मागणीवर गुरुवारी सुनावणी होणार होती. मात्र, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनामुळे प्रादेशिक राजकीय शोक घोषित करण्यात आला होता. आसारामनं आपल्या मागणीत म्हटलं आहे, की अॅलोपॅथीचा उपचार त्याच्यावर विशेष परिणाम करत नाही, त्यामुळे आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिली जावी. उच्च न्यायालय आज याच मागणीवर सुनावणी करणार आहे. हेही वाचा -  11 दिवसांच्या रक्तरंजित संघर्षानंतर इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम! आसारामनं म्हटलं आहे, की सुरुवातीपासून त्यानं आयुर्वेदिक पद्धतीनंच उपचार घेतले आहेत. त्यामुळे, हीच पद्धत माझ्यासाठी उपयुक्त आहे. आसारामनं असंही म्हटलं, की त्याच्या शरीरात हिमोग्लोबीन सतत कमी होत आहे. हे धोकादायक ठरु शकतं. अशात माझ्यावर आयुर्वेदीक उपचार केले जावेत. हेही वाचा - PM बोरिस जॉन्सन यांच्यावर उपचार करणाऱ्या नर्सचा राजीनामा,समोर आलं धक्कादायक कारण कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारादरम्यान आसारामच्या पोटात अल्सर झाल्याची शंक होती. त्याच्या शरीरातून सतत रक्त वाहत होतं. यानंतर त्याला मथुरादास माथुर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आसारामचं हिमोग्लोबीनही सातत्यानं कमी होत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Coronavirus, Criminal, High Court

    पुढील बातम्या