गांधीनगर, 7 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची (Covid-19) संख्या वाढत असताना शेजारच्या गुजरात (Gujrat) राज्यातून एक काळजीची बातमी आहे. राज्यातील वाढत्या कोरोनाा रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्यात 3-4 दिवस संचारबंदी लागू करण्याचे निर्देश गुजरात उच्च न्यायालयानं (Gujrat High Court) राज्य सरकारला दिले आहेत. गुजरातमध्ये रोज जवळपास तीन हजार कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गुजरातमधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील सरकारी, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी असं न्यायालयानं म्हंटलं आहे. 20 शहरांमध्ये संचारबंदी लागू उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारनं राज्यातील 20 शहरं आणि 8 महागरांमध्ये रात्री 8 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार (7 एप्रिल) पासून या निर्णयाची अंंमलबजावणी होईल. या सर्व शहरांमध्ये कोरना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी (Vijay Rupani) यांनी ही घोषणा केली आहे. (हे वाचा- राज्यात 3 दिवस इतकाच लसीकरणाचा साठा, राजेश टोपेंनी केंद्राकडे मागितली मदत ) राज्यात लग्न समारंभांना फक्त 100 नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सर्व मोठे कार्यक्रम 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. गुजरातमधील सर्व सरकारी कार्यालयं 30 एप्रिलपर्यंत दर शनिवारी बंद असतील. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आठ शहरांमध्ये नवे कोव्हिड सेंटर सुरु करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. प्रत्येक कोव्हिड सेंटरमध्ये 500 बेडची क्षमता आहे. दर मिनिटाला दोघांना लागण गुजरातमध्ये सोमवारी कोरोना व्हायरसचे 3160 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात सध्या 16, 152 सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येचं प्रमाण पाहिलं तर दर मिनिटाला दोन जणांना कोरनाची लागण होत आहे. देशात सोमवारी 1,03,558 जणांना कोरनाची लागण झाली. हा एका दिवसात आढळलेली कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







