Home /News /coronavirus-latest-news /

कभी हाँ कभी ना! सरकारी निर्णयात पुन्हा बदल; कोकणात आता होळीचे निर्बंध घेतले मागे

कभी हाँ कभी ना! सरकारी निर्णयात पुन्हा बदल; कोकणात आता होळीचे निर्बंध घेतले मागे

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यातील विविध जिल्ह्यात पुन्हा नव्याने निर्बंध लादण्यात येत आहेत. तर लॉकडाऊनची घोषणा करून ते निर्णय अचानक रद्द केले जात आहेत. आता रत्नागिरी प्रशासनानेही कोरोना विषाणूच्या कठोर नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला असून होळी आणि शिमग्याच्या (Corona Restrictions on holi and Shimga) नियमांत मोकळीक देण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    रत्नागिरी, 15 मार्च : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा विळखा वाढतचं चालला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची (Corona Patients) वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून पुन्हा नव्याने निर्बंध लादण्याचा निर्णय घेतले जात आहेत. पण हे निर्णय घेताना सरकार आणि प्रशासनामधील संवादाचा अभाव सातत्यानं चव्हाट्यावर येताना दिसत आहे. कारण राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये घेण्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर हे निर्णय अचानक रद्द करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. आता यामध्ये आणखी एका जिल्ह्याची भर पडली असून रत्नागिरी प्रशासनाने युटर्न मारला आहे. रत्नागिरी प्रशासनाने कोरोना विषाणूच्या कठोर नियमांत आता शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतं आहे. तसेच याचा फटका जिल्ह्यातील कामगारांना आणि व्यावसायिकांना बसत आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 10 मार्च रोजी परिपत्रक काढून जिल्ह्यातील नागरिकांनावर कठोर नियम लादले होते. यावर्षी होळी आणि शिमग्याची पालखी नाचवता येणार नाही. होळीचा सण साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे, असं देखील सरकारी आदेशात म्हटलं होतं. आता याबाबत रत्नागिरी प्रशासनाने यु-टर्न मारला आहे. आता नवीन आदेशानुसार होळी आणि शिमाग्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर देवीदेवतांच्या पालख्या आता घरोघरी दर्शनासाठी नेण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी दिली आहे. पण यासाठी सौम्य निर्बंध लादले आहेत. या पालखी सोबत केवळ 25 लोकांना एकत्रित येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच पालखीसोबत असणाऱ्या भाविकांना कोरोना चाचणी आणि शारिरीक अंतर राखणं बंधनकारक केलं आहे. त्यामुळे आज 15 मार्च रोजीच्या नवीन परिपत्रकानुसार काही नियम आणि अटींसह पालखी जाणार घरोघरी घेवून जाता येणार आहे. हे ही वाचा - महाराष्ट्रात अजब कारभार, या 2 जिल्ह्यांतील लॉकडाऊनचा आदेश अचानक घेतला मागे, लोकांमध्ये संभ्रम रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अवघ्या चार दिवसांपूर्वी दिलेला आदेशात स्वतः फेरबदल केले आहेत. असं असलं तरी राज्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी झालेला नाही. आज राज्यात 16620 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच कोरोना विषाणूच्या रुग्णात एवढी मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत असताना, सरकारने कोरोना विषाणूच्या निर्बंधाबाबत 'कभी हाँ कभी ना धोरण' अवलंबलं आहे. त्यामुळे नागरिकांची पुरती धांदल उडत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Ratnagiri

    पुढील बातम्या