नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Coronavirus) संक्रमणाची प्रकरणं कमी झाली आहेत. त्याचबरोबर मृतांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून येत आहे. बहुतेक राज्यांत संक्रमणाचा प्रसार थांबला आहे पण एनआयटीआय आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल हिवाळ्याच्या मोसमात (Coronavirus in Winters) संसर्ग होण्याची शक्यता नाकारत नाही. मात्र, ते असेही म्हणतात की मार्गदर्शक तत्त्वे अवलंबली गेली तर 2021 फेब्रुवारीपर्यंत देशात कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. देशातील साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी तसेच समन्वय साधण्यासाठी पॉल हे तज्ज्ञ पॅनेलचे प्रमुख देखील आहेत. ते म्हणाले की कोव्हिड-19ची लस एकदा आली की नागरिकांना पुरविण्यासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी प्रथमच कबूल केले की कोव्हिड-19 भारतात समुदायिक पातळीवर पसरत आहे. कोरोना आता केवळ काही जिल्हे आणि राज्यांपुरते मर्यादित आहे. वाचा- देशातल्या काही भागात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन- केंद्रीय आरोग्यमंत्री या राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढतीच पॉल म्हणाले की, “कोरोनाच्या संसर्गाची आणि मृतांची संख्या गेल्या तीन आठवड्यांत कमी झाली आहेत आणि बहुतेक राज्यात संक्रमणाचा प्रसार थांबला आहे. मात्र अशी पाच राज्ये (केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल) आणि तीन ते चार केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे अद्याप संक्रमणाचे प्रमाण वाढत आहे.” पॉल हे नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोव्हिड-19 तज्ज्ञ गटाचे प्रमुख देखील आहेत. वाचा- भारतात कोरोनाचं रूप बदललं नाही, PMOनं लशीबाबत दिली महत्त्वपूर्ण माहिती कधी होणार देश कोरोनामुक्त? पॉल यांच्या मते भारत आता चांगल्या स्थितीत आला आहे, मात्र 90 टक्के लोकांना अद्याप कोरोना विषाणूची लागण सहज होऊ शकते. हिवाळ्याच्या हंगामात भारतात संसर्गाची दुसरी लाट येऊ शकते का असे विचारले असता पॉल म्हणाले की, हिवाळा सुरू होताच युरोपमधील देशांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. ते म्हणाले की, आम्ही हे नाकारू शकत नाही. हिवाळ्यातील कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी काही नियमांवर जोर दिला. तर कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्यामुळे 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.