जाहिरात
मराठी बातम्या / देश / ऑक्टोबरपासून मुलांनाही कोरोनाची लस मिळणार, जगातील पहिली DNA Zycov-D लसीचा घेणार डोस

ऑक्टोबरपासून मुलांनाही कोरोनाची लस मिळणार, जगातील पहिली DNA Zycov-D लसीचा घेणार डोस

Corona Vaccination Children: येत्या ऑक्टोबरपासून मुलांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. DNA लस Zycov-D चा डोस मुलांना देण्यात येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: जगातील पहिली DNA लस Zycov-D ला भारतात परवानगी मिळाली आहे. आता NTAGI ची प्रमुख NK अरोरा यांनी सांगितलं की, ऑक्टोबरपासून मुलांचं लसीकरण (Corona Vaccination) केले जाईल. यामध्ये गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार केली जाईल. या मुलांना सर्वात आधी लस मिळेल. दरम्यान राज्य सरकारांना बौद्धिक विकासासाठी प्राथमिक शाळा लवकर उघडण्याची सूचना आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलांना गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार केली जाईल. जेणेकरून त्यानंतर लसीचे प्राधान्य ठरवले जाईल, असंही एन के अरोरा यांनी सांगितलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी महत्त्वाची, हे आहेत देशातल्या तिसऱ्या लाटेचे संकेत Zycov D लस आणण्यापूर्वी या सर्व यादी सार्वजनिक करण्यात येणार आहेत. या यादीच्या आधारे, ऑक्टोबरपासून 12 ते 17 वयोगटातील ज्या मुलांना गंभीर आहेत, त्यांना लस मिळण्यास सुरुवात होईल. गंभीर आजार असलेल्या मुलांना प्राधान्य 12 ते 17 वयोगटात 12 कोटी लहान मुलं आहेत. निरोगी मुलांमध्ये गंभीर आजार किंवा मृत्यूची शक्यता नगण्य आहे. 18-45 वयोगटातील लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता 10 ते 15 टक्के जास्त असते. गंभीर आजार(Comorbidity) असलेल्या मुलांची चिंता आहे म्हणून त्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात