• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • लसीकरण झालेलेही पसरवतात Corona Infection, नव्या संशोधनात धक्कादायक निष्कर्ष

लसीकरण झालेलेही पसरवतात Corona Infection, नव्या संशोधनात धक्कादायक निष्कर्ष

पुण्यातून आली चिंता वाढवणारी बातमी; कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढलली नवी बुरशी

पुण्यातून आली चिंता वाढवणारी बातमी; कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढलली नवी बुरशी

कोरोना प्रतिबंधक लस (Fully vaccinated people also transmit corona like non vaccinated one says research) घेतलेले नागरिक हे लस न घेतलेल्यांप्रमाणेच कोरोनाच फैलाव करत असतात, हे नव्या संशोधनातून सिद्ध झालं आहे.

 • Share this:
  लंडन, 29 ऑक्टोबर : कोरोना प्रतिबंधक लस (Fully vaccinated people also transmit corona like non vaccinated one says research) घेतलेले नागरिक हे लस न घेतलेल्यांप्रमाणेच कोरोनाच फैलाव करत असतात, हे नव्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. लंडनमधील इम्पिरिकल कॉलेजमध्ये (Research by Empirical Collage) झालेल्या संशोधनातून हे समोर आलं आहे. लस घेतलेल्या लोकांना कोरानाचा त्रास होण्याची शक्यता कमी असते. मात्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कोरोना पोहोचवण्याची त्यांची क्षमता लसीमुळे कमी होत नाही, हे दिसून आलं आहे. त्रास कमी, पण फैलाव तितकाच कोरोनाची लस घेतल्यामुळे कोव्हिड व्हायरसपासून शरीराला होणारं नुकसान कमी होतं. (नव्हे. लस न घेतलेल्यांप्रमाणे लस घेतलेल्यांच्या शरीरातही कोरोनाचा व्हायरस जातो आणि हा व्हायरस ते कुटुंबातील इतर व्यक्तींपर्यंत पोहोचवू शकतात, हे नव्या संशोधनातून दिसून आलं आहे. लस न घेतलेल्या व्यक्ती या लस घेतलेल्या व्यक्तींच्या तुलनेत कमी वेगानं कोरोनाचा फैलाव करतात, हेदेखील या संशोधनातून दिसून आलं आहे. या संशोधनासाठी एकूण 621 जणांचं निरीक्षण करण्यात आलं. सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत या सर्वांवर प्रयोग करण्यात आले. यातील प्रत्येकाला कोरोना झाला होता. काहींना गंभीर लक्षणं होती तर काहींना कुठलीही लक्षणं दिसत नव्हती. या व्यक्तींच्या कुटुंबांचं निरीक्षण प्रयोगात करण्यात आलं. हे वाचा- Mumbai Drug Case: नवाब मलिकांच्या आरोपांवर काशिफ खान यांचं उत्तर या व्यक्तींच्या संपर्कात येणारे मात्र लसीकरण न झालेल्या 205 कुटुंबांमध्ये केवळ 64 दिवसांत 53 घरांत कोरोनाची लागण इतरांना झाली. तर लसीकरण झालेल्या कुटुंबांमध्ये अशा प्रकारे कोरोनाची लागण व्हायला तब्बल 100 दिवस लागले. याचाच अर्थ कोरोनाची लस घेतल्यामुळे कोरोनाची लागण होण्याचा वेग मंदावतो. मात्र तरीही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली व्यक्ती ही कोरोनाची कॅरियर ठरू शकते, हे यातून सिद्ध झालं.
  Published by:desk news
  First published: