मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन, दिल्लीमध्ये घेतला अखेरचा श्वास

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन, दिल्लीमध्ये घेतला अखेरचा श्वास

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांचे निधन झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे. कोरोनाची लागण झाल्याने गांधी यांची प्रकृती अत्यवस्थ होती.

अहमदनगर, 17 मार्च: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांचे निधन झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे. ते 70 वर्षांचे होते. कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याने गांधी यांची प्रकृती अत्यवस्थ होती. दिल्लीत (Delhi) खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. 17 मार्च 2021 रोजी त्यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून गांधी दिल्लीतच असल्याची माहिती मिळते आहे. त्रास होऊ लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली आणि त्यात ते पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचे आढळून आले होते. मंगळवारीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

मंगळवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. काल दुपारपासूनच त्यांना दिल्लीतील खाजगी रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. बुधवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.

दिलीप गांधी तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून निवडून आले होते. 2003 ते 2004 दरम्यान त्यांनी भाजप सरकारच्या काळात केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.

बातमी अपडेट होत आहे

First published:

Tags: Corona, Corona updates, Coronavirus