उत्तर प्रदेश, 16 मे : जसं जसं ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढत आहे, तसे तसे मृत्यूचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. अनेक ग्रामीण भागात अवैध डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता नव्या प्रकरणात ग्रेटर नोएडाच्या भागात डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे 32 वर्षांच्या तरुणीला सलग 15 ग्लुकोजच्या बाटल्या चढविण्यात आल्या. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
अवैध डॉक्टरामुळे तरुणीचा मृत्यू
14 मे रोजी गौतमबुद्ध नगर येथे राहणारी रतनलाल यांची कन्या अलका हिला फणफणून ताप आला होता. त्यानंतर तिला जवळील रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तरुणीची कोविड चाचणी न करता तिला 15 ग्लुकोजच्या बाटल्या चढवल्या. यादरम्यान अलकाची प्रकृती अधिक बिघडली. मात्र तरीही डॉक्टर तिच्यावर चुकीचे उपचार करीत होते. तरुणीची प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी हात वर केले. यानंतर अलकाच्या कुटुंबीयांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. तपासानंतर अलकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
हे ही वाचा-कोरोनाने माणुसकी संपवलीये का? 2 दिवस 90 वर्षांच्या आजी जनावरांच्या गोठ्यात पडून
डॉक्टराच्या निष्काळजीपणाची बातमी कळताच अधिकारी सक्रिय झाले आहेत. तातडीने या प्रकरणाच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत सांगायचं झालं तर गावात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.