मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /कोरोनाने माणुसकी संपवलीये का? 2 दिवस 90 वर्षांच्या आजी जनावरांच्या गोठ्यात होत्या पडून

कोरोनाने माणुसकी संपवलीये का? 2 दिवस 90 वर्षांच्या आजी जनावरांच्या गोठ्यात होत्या पडून

तब्बल दोन दिवस ही आजी जनावऱ्यांच्या गोठ्यात निवस्त्र अवस्थेत पडून होती, शेवटी...

तब्बल दोन दिवस ही आजी जनावऱ्यांच्या गोठ्यात निवस्त्र अवस्थेत पडून होती, शेवटी...

तब्बल दोन दिवस ही आजी जनावऱ्यांच्या गोठ्यात निवस्त्र अवस्थेत पडून होती, शेवटी...

बीड, 16 मे : कोरोनाच्या भीषण संकटात माणुसकी अक्षरशः हरवत चालली आहे. एकीकडे मदतीचा ओघ सुरू असताना दुसरीकडे मात्र जवळचेच लांब जात असल्याचं दिसत आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा शहराजवळ नाळवंडी गावात दोन दिवसांपासून जनावरांच्या गोठयात पडलेल्या 90 वर्षांच्या गंभीर आजारी आजीजवळ कोरोनाच्या भीतीने कोणीही जवळ आले नाही. आजीच्या घरातील सर्वजण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. अशा परिस्थितीत विजयसिंह बांगर नावाच्या युवकाने या आजीला स्वतःच्या हाताने उचलून कोविड सेंटरपर्यंत पोहोचवलं. आजीची प्रकृती बरी असून तिच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

पाटोदा तालुक्यातील नाळवंडी गावात गुजर कुटुंब कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र त्याच कुटुंबातील घरी असलेल्या एका 90 वर्षीय आजीही गंभीर आजारी झाली होती. परंतु घरी कोणीच नसल्याने दोन दिवसांपासुन गंभीर अवस्थेत जनावराच्या गाेठयासमोर पडून होती. मात्र कोरोनाच्या भीतीने मदतीला कोणीच आलं नाही. त्यामुळे ती अंथरुणावर अक्षरश: पडून होती. याबाबत कळताच विजयसिंह बांगर या तरुणाने आजीला हाताने उचलून स्वत:च्या गाडीतून बीड जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये भरती केलं.

हे ही वाचा-बापाचा खांदाच झाला लेकीची तिरडी; कोरोना अजून किती अंत पाहणार? भयावह VIDEO

कोरोनाच्या भीतीने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जनावराच्या गोठयासमोर ही आजी उघड्यावर विवस्त्र अवस्थेत पडून होती. गंभीर आजारी व अन्नपाणी पोटात नसल्याने तोंडातून आवाजही निघत नव्हता. मात्र भीषण परिस्थिती असूनही केवळ कोरोनाच्या भीतीने कुणी मदतीला येत नव्हतं. बांगर यांनी कोणताही विचार न करता त्या वृद्धेला वस्त्र घातले, स्वतः पाणी पाजलं. त्यानंतर स्वतःच हाताने उचलून गाड़ीत टाकलं व बीड येथे उपचारासाठी नेले. सध्या ती वॄद्ध महिला बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.

First published:

Tags: Beed news, Corona patient, Coronavirus