नवी दिल्ली 27 एप्रिल : देशात कोरोनाचं (Coronavirus) थैमान सुरूच आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारं आणि आरोग्य विभाग कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मागील काही दिवसांपासून देशात दिवसाला तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. सोमवारी देशात नवीन रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. सोमवारी देशात 3,23,144 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशात काही तज्ज्ञांनी देशात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची(Experts on Full Lockdown) गरज असल्याचं म्हटलं आहे. देशातील काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की देशात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन (Full Lockdown) करण्याची गरज आहे. तरच आपण कोरोनाची साखळी तोडू शकतो. म्हणजेच आता तज्ज्ञ लॉकडाऊनच कोरोनाची गंभीर स्थिती आटोक्यात असल्याचं सांगत आहेत. जाणकारांचं असं म्हणणं आहे, की लॉकडाऊनमुळे अडचणींमध्ये वाढ होईल. मात्र, जिथे परिस्थिती बिकट आहे तिथे संपूर्ण लॉकडाऊन गरजेचं आहे. संपूर्ण लॉकडाऊनबाबत इंडिया टुडेसोबत बोलताना PHFI बंगळुरुमध्ये लाइफकेअर एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापक आणि प्रमुख असलेल्या डॉक्टर गिरिधर बाबू यांनी सांगितलं, की संपूर्ण लॉकडाऊन कोरोनापासून बचावाचा एकमेव पर्याय आहे. ते म्हणाले, की कोरोनाचा वाढता प्रसार पाहाता, याबाबात निर्णय घ्यायला हवा. सध्या जिथे रुग्ण अधिक आढळत आहेत तिथे लॉकडाऊनची गरज आहे, जेणेकरुन साखळी तोडणं शक्य होईल. आपल्याला रुग्णसंख्या कमी करण्यासोबतच आरोग्य सुविधांवर लक्ष देणंही गरजेचं आहे. ‘संपूर्ण लॉकडाऊनबाबत बोलताना कर्नाटक सरकारच्या कोविड टास्क फोर्सच्या विशेषतज्ज्ञ समितीचे सदस्य डॉक्टर विशाल राव म्हणाले, की लॉकडाऊनमुळे देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी आपल्याला आपल्या उपाययोजनांमध्ये बदल करणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.