मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /सर्वांनाच कोरोनाबाधित मानण्याचा सल्ला देतात अमेरिकेतील तज्ज्ञ; वाचा काय आहे कारण?

सर्वांनाच कोरोनाबाधित मानण्याचा सल्ला देतात अमेरिकेतील तज्ज्ञ; वाचा काय आहे कारण?

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave of Corona) संसर्गाचा वेग आणि प्रमाण जास्त आहे. या वेळच्या संसर्गाचं वैशिष्ट्य हे आहे, की त्यात प्राथमिक किंवा पूर्व-लक्षणं दिसणाऱ्या (PreSymptomatic) रुग्णांची संख्या जास्त आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave of Corona) संसर्गाचा वेग आणि प्रमाण जास्त आहे. या वेळच्या संसर्गाचं वैशिष्ट्य हे आहे, की त्यात प्राथमिक किंवा पूर्व-लक्षणं दिसणाऱ्या (PreSymptomatic) रुग्णांची संख्या जास्त आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave of Corona) संसर्गाचा वेग आणि प्रमाण जास्त आहे. या वेळच्या संसर्गाचं वैशिष्ट्य हे आहे, की त्यात प्राथमिक किंवा पूर्व-लक्षणं दिसणाऱ्या (PreSymptomatic) रुग्णांची संख्या जास्त आहे.

  कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave of Corona) संसर्गाचा वेग आणि प्रमाण जास्त आहे. या वेळच्या संसर्गाचं वैशिष्ट्य हे आहे, की त्यात प्राथमिक किंवा पूर्व-लक्षणं दिसणाऱ्या (PreSymptomatic) रुग्णांची संख्या जास्त आहे. ही चिंतेची बाब आहे. 60 टक्क्यांपर्यंतच्या रुग्णसंख्येला अशी पूर्व-लक्षणं दिसत असल्यामुळे या सर्वांनाच संसर्गग्रस्त मानायला हवं, असं अमेरिकेतल्या तज्ज्ञांना वाटतं.

  सध्याच्या लाटेत ज्यांना संसर्ग होतो आहे, त्यापैकी 30 ते 59 टक्के व्यक्ती पूर्व-लक्षणं असलेल्या आहेत, हा चिंतेचा विषय आहे, असं मत युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डर आणि को-ऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन एन्व्हार्यर्न्मेंटल सायन्सेस (CIRES)या संस्थांमध्ये कार्यरत असलेले केमिस्ट जोस लुइस जिमिनेज यांनी व्यक्त केलं.

  लॅन्सेट या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकात अलीकडेच सहा वैज्ञानिकांचं कोरोनाबद्दलचं आकलन सांगणारा लेख प्रसिद्ध झाला. त्या सहा वैज्ञानिकांमध्ये जिमिनेज यांचाही सहभाग आहे. कोविड-19चा प्रसार हवेमार्फतही होतो आहे, याचे पुरावे मिळत असल्याचं या लेखात म्हटलं होतं. 'पूर्व-लक्षणं दिसणाऱ्या व्यक्ती अशा असतात, की त्यांच्यामार्फत विषाणूचा प्रसार होत असतो; मात्र आपल्याला स्वतःला संसर्ग झाला आहे, याची त्यांना कल्पना नसते. तसंच त्यांना संसर्ग झालाय, हे दुसऱ्यांनाही ओळखू येत नाही,' असं जिमिनेज यांनी सांगितलं.

  हे ही वाचा-कोरोनामुळे स्मशानातील निखारे धगधगतेच; दापोलीतील घटना वाचून अंगावर काटा उभा राहील

  या व्यक्ती कशा ओळखायच्या?

  पूर्व-लक्षणं असलेल्या व्यक्ती ओळखता येत नाहीत. त्या खोकत नसतात, शिंकत नसतात. आपलं सर्वसामान्य जीवन जगत असतात. त्या व्यक्ती काम करत असतात, कुटुंबीय, मित्रमंडळींना भेटत असतात, खरेदी करत असतात; थोडक्यात, त्यांचे सगळे व्यवहार सुरू असतात; पण त्या संसर्गग्रस्त व्यक्ती असतात आणि तो संसर्ग पसरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. म्हणूनच, सगळ्याच व्यक्तींना संसर्गग्रस्त मानणं हा त्यावरचा उपाय आहे. जो कोणी तुमच्यासमोर येईल, त्याला संसर्ग झालेलाच आहे, असं समजूनच वागावं, असं जिमिनेज म्हणाले.

  सध्याची महामारी का पसरली आहे? पहिलं कारण म्हणजे त्याला प्रतिकार करण्याची शक्ती (Immunity) आपल्यात नाही. दुसरं कारण म्हणजे तो हवेच्या माध्यमातून पसरत असल्यामुळे सहजगत्या फैलावतो. बाह्यलक्षणं दिसत नसलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून तो पसरतो, हे तिसरं कारण असल्याचं जिमिनेज यांनी सांगितलं. अशा व्यक्तींना प्री-सिम्प्टमॅटिक असं म्हटलं जातं.

  पूर्व-लाक्षणिक संसर्ग का महत्त्वाचा?

  SARS-CoV-1 या विषाणूचा प्रसार 2003मध्ये झाला होता. तोही हवेच्या माध्यमातून पसरत होता आणि त्याला प्रतिकार करण्याची शक्तीही आपल्यात नव्हती; मात्र तो पूर्व-लाक्षणिक प्रकाराने फैलावत नव्हता. ज्या व्यक्ती बऱ्याच आजारी होत्या, त्यांच्यापासूनच तो फैलावत होता. त्यामुळे अशा व्यक्तींना ओळखून विलग करणं सोपं होतं. त्या विषाणूचा संसर्ग झालेले 9000 रुग्ण आढळले. SARS-CoV-2 अर्थात आजच्या कोरोना विषाणूचा संसर्ग लाखो लोकांना झाला आहे. त्यामुळेच पूर्व-लाक्षणिक स्थितीत होणारा संसर्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचं जिमिनेज म्हणतात.

  अमेरिकेच्या 'सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन'ने (CDC) म्हटलं आहे, की संसर्गग्रस्त व्यक्तींचा संपर्क आणि संपर्कात आलेल्या पृष्ठभागांच्या माध्यमातून संसर्ग पसरू शकतो; मात्र जिमिनेज म्हणतात, की पृष्ठभागांचं निर्जंतुकीकरण करून काहीही उपयोग नाही. ड्रॉपलेटच्या माध्यमातून संसर्ग पसरत असल्याचं म्हटलं जात असलं, तरी त्याचे थेट पुरावे मिळालेले नाहीत. कोविड-19 हा पहिल्यापासूनच हवेतूनच पसरणारा आजार होता, असं जिमिनेज यांचं म्हणणं आहे. त्यांचा हा दावा खोडूनही काढता येत नाही आणि सिद्धही करता येत नाही. कारण, कोरोनाची लक्षणं बदलत चालली आहेत आणि संसर्ग वेगाने होत चालला आहे, हे आपण पाहतो आहोतच.

  First published:

  Tags: Corona spread, Corona updates, United States of America