मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

लसीची 'पॉझिटिव्ह' स्टोरी! ज्यांना वाटतं ना लस का घ्यावी? त्यांनी हा अनुभव वाचावा..

लसीची 'पॉझिटिव्ह' स्टोरी! ज्यांना वाटतं ना लस का घ्यावी? त्यांनी हा अनुभव वाचावा..

कोविडच्या तिसऱ्या लाटेत वेगाने वाढणाऱ्या केसेस पाहून अनेकांना असा प्रश्न पडतो की जर लस घेऊनही कोविड होतोय तर मग लस काय कामाची? असा प्रश्न पडणे चुकीचे नाही. मात्र, लसीकरण काहीच उपयोगाचे नाही असा अर्थ आपण त्यातून काढणार असू तर गडबड है बॉस!

कोविडच्या तिसऱ्या लाटेत वेगाने वाढणाऱ्या केसेस पाहून अनेकांना असा प्रश्न पडतो की जर लस घेऊनही कोविड होतोय तर मग लस काय कामाची? असा प्रश्न पडणे चुकीचे नाही. मात्र, लसीकरण काहीच उपयोगाचे नाही असा अर्थ आपण त्यातून काढणार असू तर गडबड है बॉस!

कोविडच्या तिसऱ्या लाटेत वेगाने वाढणाऱ्या केसेस पाहून अनेकांना असा प्रश्न पडतो की जर लस घेऊनही कोविड होतोय तर मग लस काय कामाची? असा प्रश्न पडणे चुकीचे नाही. मात्र, लसीकरण काहीच उपयोगाचे नाही असा अर्थ आपण त्यातून काढणार असू तर गडबड है बॉस!

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

पुणे, 13 जानेवारी : कोरोना लसीकरणाबाबत अजूनही जगभरातील काही टक्के लोकांमध्ये उदासीनता पाहायला मिळत आहे. ताजं उदाहरण द्यायचं झालं तर सर्बियाचा टेनिस स्टार नोव्हाक जोकोविच. नोव्हाकने लस घेतली नसल्याने ऑस्ट्रेलियाने त्याचा व्हिसा रद्द केला. मात्र, कोर्टात तो ही केस जिंकला. लसीकरण न झाल्याचा फटका अनेक देशांना बसत आहे. सध्या उपलब्ध झालेल्या डेटावरुन लसीकरण झालेल्या माणसांना कोरोनाचा संसर्ग होत नाही आणि झाला तरी तुलनेने याचा त्रास कमी होत असल्याचे समोर आले आहे. याच संदर्भात आमचे वाचक शंकर गवळी यांनी आपला अनुभव शेअर केला आहे.

मी सध्या CFAR (Center for Research and Advocacy) नावाच्या संस्थेत काम करतो. संस्थेचा लसीकरणाचा प्रोजेक्ट येरवडा, वडगाव शेरी आणि शिवाजीनगर या तीन वॉर्ड एरियातील वस्त्यांमध्ये सुरू आहे, पैकी मी वडगाव शेरी आणि शिवाजीनगर या भागाचा समन्वयक म्हणून काम पाहतो. या भागातल्या वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन सर्वे करणे, ज्यांनी अद्याप लस घेतली नाहीये, किंवा लस घेण्याची भीती वाटते अशा नागरिकांना लस घेण्यासाठी तयार करणे, आवश्यकतेनुसार महानगरपालिकेच्या सहकार्याने कॅम्प आयोजित करणे किंवा जवळच्या सरकारी केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांना पाठवणे असं कामाचं सर्वसाधारण स्वरूप आहे.

मी गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करतो त्यामुळे माझा रोज अनेकांशी संपर्क येत असतो. कोविडच्या सुरुवातीच्या काळात कामानिमित्त जवळपास तीन महिने गावीच होतो, नंतर लॉकडाउन थोडं सैल झाल्यावर पुण्यात आलो आणि पहिल्याच दिवशी बातमी कानावर आली की आमच्या सोसायटीत पेशंट सापडला आहे आणि पुढच्या दोनच दिवसांत पेशंटचा आकडा वाढून आमची बिल्डिंग कंटेन्मेंट झोन जाहीर झाली. मनात म्हटलं कुठून आगीतून उठून फुफाट्यात आलो. थोड्याच दिवसांत कोविड बाबाने मलाही गाठलंच.

पहिल्या दिवशी सर्दीने घसा धरला आणि जाणीव झाली की दया कुछ तो गडबड है! ही सर्दी नेहमीसारखी नव्हती. तरिही मन म्हणत होतं की मानायला तयार नव्हतं. दोन-तीन दिवस व्हायरल असेल असं म्हणून ट्रीटमेंट घेतली. मात्र, पाठ इतकी जाम झालेली की जीव कंठाशी आलेला. शेवटी न राहवून टेस्ट केलीच अन् खात्री झाली की हा बाबा शरीरात मुक्काम ठोकून बसलाय म्हणून. क्षणभर काहीच सुचत नव्हतं. आता पुढे काय? थोडा वेळ एकाच जागेवर बसून राहिलो, मग उठलो आणि पहिला फोन आईला केला, मग बायकोला. त्यांनी धीर दिल्यावर थोडं बरं वाटलं. काही मोजक्या मित्र-मंडळींना कळवलं, त्यांनीही धीर दिला. मग जीवात जीव आला.  

जर एखाद्याने अद्याप Corona Vaccine घेतली नसेल तर कायदेशीररित्या काय होईल?

लस घेतल्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह

ऑक्सीजन लेव्हल नॉर्मल होती, ताप पण नव्हता, त्यामुळे जास्त त्रास होत नसल्याने सावरायला संधी मिळाली. पण नंतर हळूहळू लक्षात येत गेलं की शरीराचे स्नायू प्रचंड कमकुवत झालेलं, आधीच असलेला पित्ताचा त्रास प्रचंड वाढला होता. अशात दिवसांमागून दिवस जात होते. मागच्या वर्षी जुलै महिन्यात मी लसीचा पहिला डोस घेतला आणि लगेचच पुढच्या 15 दिवसांतच माझा कोविड रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला.

पोस्ट कोविड त्रासातून शरीर रिकव्हर झालेलं नव्हतं तोच पुन्हा एकदा इन्फेक्शन झाल्याने मनात थोडी भीती होतीच. पण, याही वेळी सहीसलामत त्यातून बाहेर पडलो. उलट पहिल्या वेळेसपेक्षा कमी त्रास झाला असं वाटत होतं. पण जसा डिस्चार्ज घेऊन घरी आलो तसतसं जाणवायला लागलं की थकवा प्रचंड आहे. अगदी जिन्याच्या 8-10 पायऱ्या चढून गेलं, थोडं कष्टाचं काम केलं तरी अगदी गळून गेल्यासारखं वाटत होतं आणि यातून बाहेर पडण्यात जवळपास तीन महिने गेले. हळूहळू हे लक्षात येत गेलं की पहिल्या वेळेसपेक्षा दुसऱ्या वेळेसच्या विषाणूने शरीराची जास्त झीज केलीय.

लस घेतली नसती तर कदाचित परिस्थिती वेगळी असती..

खरंतर पहिल्या वेळेस झालेलं इन्फेक्शन आणि लसीचा पहिला डोस यामुळे माझ्या शरीराला या विषाणूची तोंडओळख झालेली होती. त्यामुळे माझ्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी वेळीच ऍक्टिव्ह झाल्या असाव्यात आणि मी या दुसऱ्यांदा झालेल्या इन्फेक्शनमधून वाचू शकलो असेल. कारण हेच जर पहिलं इन्फेक्शन असतं तर आणि लसीचा एकही डोस झालेला नसता तर कदाचित परिस्थिती यापेक्षा जास्त कठीण असू शकली असती. कारण माझी प्रतिकारशक्ती आधीच बोंबललेली आहे.

कोविडच्या नवनवीन लाटा अजून किती काळ येत राहतील. याबद्दल खात्रीशीरपणे कुणीच काही सांगू शकत नाही. मात्र, आपण लस घेतलेली असेल किंवा आधी एकदा कोविड होऊन गेलेला असेल तर शरीराला त्या व्हायरसची ओळख झालेली असते आणि अशावेळी आपलं शरीर त्या व्हायरसला लवकर प्रतिकार करायला शिकतं. त्यामुळं न कंटाळता लसीचे दोन्ही डोस आणि त्यापुढेही येणारे डोस न कंटाळता घेतले पाहिजेत असं मला तरी वाटतं.

नोट : हा संपूर्ण अनुभव शंकर गवळी यांचा असून आम्ही फक्त शब्दबद्ध केला आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Vaccine