जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / कर्मचारी झोपल्याचं पाहून भडकले ऊर्जामंत्री; स्वतःच सॅनिटाइज केलं शहर, पाहा VIDEO

कर्मचारी झोपल्याचं पाहून भडकले ऊर्जामंत्री; स्वतःच सॅनिटाइज केलं शहर, पाहा VIDEO

कर्मचारी झोपल्याचं पाहून भडकले ऊर्जामंत्री; स्वतःच सॅनिटाइज केलं शहर, पाहा VIDEO

कर्मचारी सॅनिटायझेशन (Sanitization) मशीनसोबतच घरामध्ये झोपला होता. यानंतर मंत्री अधिकाऱ्यांवर भडकले आणि त्यांनी स्वतः सॅनिटायझेशन मशीन (Sanitization Machine) आपल्या पाठीवर घेत शहर सॅनिटाइज करण्याचं काम सुरू केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ 09 मे : ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर हे नेहमीच आपल्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखले जातात. तोमर मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वालियर जिल्ह्यातील कोविड-19 चे (Covid-19) प्रभारी मंत्री आहेत. याच कारणामुळे आरोग्य विषयक सेवेंवर ते नजर ठेवून असतात. शनिवारी ते ग्वालियर जिल्ह्यातील ग्रामीण भागांच्या दौऱ्यावर होते. डबरा येथे गेले असता त्यांना दिसलं की कर्मचारी सॅनिटायझेशन (Sanitization) मशीनसोबतच घरामध्ये झोपला होता. यानंतर मंत्री अधिकाऱ्यांवर भडकले आणि त्यांनी स्वतः सॅनिटायझेशन मशीन (Sanitization Machine) आपल्या पाठीवर घेत डबरा शहर सॅनिटाईज करण्याचं काम सुरू केलं. मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी सर्वात आधी डबरा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली. शहर सॅनिटाईज होत नसल्यानं त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारलं. मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारलं, की 11 वाजेपर्यंत सॅनिटायझेशन का झालं नाही? तेव्हा अशी माहिती मिळाली की कर्मचारीच आला नाही. जेव्हा कर्मचाऱ्याला फोन केला तेव्हा समजलं की तो सॅनिटायझेशन मशीन घरी घेऊन झोपला आहे.

हे ऐकून मंत्री नाराज झाले आणि त्यांनी लगेचच सॅनिटायझेशन मशीन मागवून घेतली. यानंतर स्वतः ही मशीन पाठीवर घेत ते डबरा शहरात निघाले. त्यांनी जवळपास एक तास शहरातील रस्त्यांवर आणि बाजारात सॅनिटायझेशन केलं. यानंतर त्यांनी नगरपालिक अधिकाऱ्यांना शहरात सतत सॅनिटायझेशन करण्याचा सल्ला दिला. मंत्री प्रद्युम्नसिंग तोमर यांनी डबरा सिव्हिल हॉस्पिटलची पाहणी केली. इथल्या रुग्णालयातील अस्वच्छता आणि रुग्णांच्या इतर तक्रारी ऐकल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना फटकारले. त्याचबरोबर रुग्णांना योग्य उपचारांची व्यवस्था करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेत आरोग्य व्यवस्थांबद्दलची सर्व माहितीही घेतली. कोरोना रुग्णांची विशेष काळजी घ्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात