नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : जगातील विविध देशांमध्ये (Various countries) करण्यात आलेल्या संशोधनातून काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींची (Anti corona vaccine) परिणामकारकता (effect) ही काही महिन्यांनंतर कमी होत असल्याचं (Reducing) दिसून आलं आहे. साधारण चार ते सहा महिने (4 to 6 months) कोरोनावरील लस ही व्यक्तीचं संरक्षण करण्यासाठी उपयोगी पडते. मात्र त्यानंतर हळूहळू शरीरातील अँटिबॉडिज कमी होतात आणि लसीची परिणामकारकता घटत असल्याचं दिसून आलं आहे.
तिसऱ्या लसीची गरज
इस्त्रायल आणि ब्रिटनमध्ये सध्या तिसरी लस द्यायला सुरुवात करण्यात आली आहे. ज्या रुग्णांच्या शरीरातील अँटिबॉडिज कमी आढळल्या आणि ज्यांची तब्येत गंभीर आहे, अशा रुग्णांना तिसरी लस दिली जात आहे. या लसीला बुस्टर डोस असंही म्हटलं जात आहे.
इस्त्रायलचं उदाहरण
देशातील 100 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण करणारा देश म्हणून इस्त्रायलनं विक्रम नोंदवला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांत लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनादेखील कोरोनाची लागण होत असल्याचं चित्र आहे. मार्च महिन्यात फायझर लसीचा दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तीच्या तुलनेत दोन महिन्यांपूर्वी हीच लस घेतलेल्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली असल्याचं काही प्रयोगांमधून दिसून आलं आहे. त्यावरूनच चार ते सहा महिन्यांनंतर लसीची परिणामकारकता कमी होत असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.
मॉर्डनाची लस सहा महिन्यांसाठी प्रभावी
मॉर्डनाची लस ही सहा महिन्यांपर्यंत प्रभावी राहते आणि त्यानंतर मात्र अँटिबॉडिज कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. बिटा व्हायरसविरोधात लढण्याची शरीराची क्षमता सहा महिन्यांनी कमी होत असल्याचं संशोधन आतापर्यंत समोर आलं आहे. मात्र डेल्टा व्हायरसबाबतचं कुठलंही संशोधन अद्याप झालेलं नाही.
हे वाचा - झुंज यशस्वी! तब्बल 130 दिवसांचा कोरोना, रुग्ण सांगतोय अनुभव
परिपूर्ण लसीची प्रतीक्षा
लसीचे दोन डोस घेतल्यानंतर कायमस्वरूपी संरक्षण मिळेल का, या प्रश्नाचं उत्तर सध्या शास्त्रज्ञ शोधत आहेत. सध्या तरी अशी कुठलाही लस बाजारात उपलब्ध झालेली नाही. बाजारात असणाऱ्या सर्व लसींची परिणामकारकता ही 4 ते 6 महिने कालावधीसाठी टिकत असल्याचंच दिसून आलं आहे. त्यामुळे काही देशांनी तिसऱ्या डोसला सुरुवात केली आहे.
अर्थात, लसीची परिणामकारकता कमी होत असली, तरी गंभीर आजारापासून संरक्षण देण्याचं काम कुठलाही लस करत असल्याचंही दिसून आलं आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव कमी झाला, तरी या लसी आजाराचं गांभिर्य कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचंही शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Coronavirus