नवी दिल्ली, 07 जून : एकिकडे देशात कोरोनाची दुसरी लाटही (Corona second wave) नियंत्रणात येताना दिसते आहे. कोरोनाची प्रकरणं मोठ्या प्रमाणात कमी झाली आहेत. लसीकरणाचा वेग वाढवला जातो आहे. अशात देशातील कोरोना प्रतिबंध हटवण्याचा विचार सुरू आहे. काही राज्यांनी कोरोना प्रतिबंध शिथील केले आहेत. तर काही राज्य तशा तयारीत आहेत. याचदरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) भारताला कोरोनाच्या मोठ्या धोक्यापासून सावध केलं आहे.
कोरोना प्रतिबंध हटवण्याची घाई करू नका, हे धोकादायक ठरू शकतं, असं डब्ल्यूएचओने भारताला म्हटलं आहे. भारतातील डेल्टा (Delta) व्हेरिएंटसह इतर चिंताजनक व्हेरिएंट्सचं वाढतं संक्रमण पाहता कोरोना प्रतिबंध हटवणं खतरनाक ठरू शकतं. ज्या लोकांना अद्याप कोरोना लस घेतली नाही आहे, त्यांना कोरोना नियमांपासून शिथिलता देणं धोकादायक ठरू शकतं, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अधानोम घेब्रेयासस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सांगितलं आहे.
हे वाचा - परदेशात जाण्याची तयारी करताय! आधी मोदी सरकारचे हे नवे नियम वाचा
भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळलेल्या B.1.617.2 व्हेरियंटला डेल्टा व्हेरियंट म्हटलं गेलं आहे. तर, दुसऱ्या B.1.617.1 स्ट्रेनचं नामकरण कप्पा (Kappa) असं केलं गेलं आहे. यातील डेल्टा व्हेरियंटचे एक विषाणू स्वरूपच (स्ट्रेन) फक्त घातक असून इतर दोन प्रकारांचा धोका कमी झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने याआधी सांगितलं होतं. हा स्ट्रेन भारतात सर्वात आधी दिसून आला होता.
व्हायरसच्या B.1.617 व्हेरिएंटला ट्रिपल म्युटेंट व्हेरिएंट म्हणण्यात आलं होतं. संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संस्थेने गेल्या महिन्यात संपूर्ण स्ट्रेनला व्हीओसी म्हणजे व्हेरिएंट ऑफ कन्सर्न घोषित केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus, Who