
परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे कर्मचारी आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये जाणारे अॅथलीट, खेळाडू आणि त्यांच्यासोबत जाणारा स्टाफ यांच्यासाठी हे नवे नियम आहेत.

31 ऑगस्ट, 2021 पर्यंत परदेशात जाणाऱ्या 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी नवे नियम जारी करण्यात आले आहेत.

परदेशात जाणाऱ्या या नागरिकांना कोविशिल्ड लशीचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर कधीही घेता येईल. सध्या या लशीच्या दोन डोसमधील अंतर हे 12 ते 16 आठवडे आहे.

परदेशात जाणाऱ्यांना ज्यांनी कोविशिल्ड लस घेतली आहे, त्यांना लसीकरण सर्टिफिकेट देण्यात येईल. या सर्टिफिकेटवर पासपोर्ट नंबर असणं बंधनकारक आहे.




