मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Positive News: देशातील ऑक्सिजन तुटवड्याचं संकट दूर होण्याच्या मार्गावर! मागणीत घट

Positive News: देशातील ऑक्सिजन तुटवड्याचं संकट दूर होण्याच्या मार्गावर! मागणीत घट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतच (2nd Wave of Coronavirus) देशावर ऑक्सिजनच्या तुटवड्याचं (Lack of Oxygen) संकटही कोसळलं होतं. मात्र, आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतच (2nd Wave of Coronavirus) देशावर ऑक्सिजनच्या तुटवड्याचं (Lack of Oxygen) संकटही कोसळलं होतं. मात्र, आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतच (2nd Wave of Coronavirus) देशावर ऑक्सिजनच्या तुटवड्याचं (Lack of Oxygen) संकटही कोसळलं होतं. मात्र, आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

नवी दिल्ली 23 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतच (2nd Wave of Coronavirus) देशावर ऑक्सिजनच्या तुटवड्याचं (Lack of Oxygen) संकटही कोसळलं होतं. रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजन सिलेंडरसाठी अनेक तास रांगेत उभा राहात असल्याचं दिसत होते. मात्र, आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील 72 तासात रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होत असून देशात ऑक्सिजनची मागणीही कमी होत असल्याचं चित्र आहे. मागील एका महिन्यात पहिल्यांदाच हे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

द इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्यानं सांगितलं, की ऑक्सिजनची दररोजची मागणी 8,900 मेट्रिक टनावरुन घटून 8,000 मेट्रिक टनावर आली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान आता ऑक्सिजनच्या मागणीत घट नोंदवली गेली असली, तरी पहिल्या लाटेच्या तुलनेत ही मागणी अजूनही खूप जास्त आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रुग्णालयांमधील ऑक्सिजनची मागणी 9 मे रोजी जवळपास 8,944 मेट्रिक टनाच्या उच्चांकावर पोहोचली. 18-19 मे रोजी हे प्रमाण 8,100 मेट्रिक टनावर आलं. मात्र, 20 मे रोजी यात पुन्हा काही प्रमाणात वाढ होऊन हा आकडा 8,334 मेट्रिक टनावर पोहोचला.

पहिल्या लाटेदरम्यान मेडिकल ऑक्सिजनची सर्वाधिक 3,095 मे. टन विक्री 29 सप्टेंबर 2020 ला पाहायला मिळाली. यानंतर यात घट येत राहिली. यंदाच्या मार्च महिन्यात मेडिकल ऑक्सिजनची एका दिवसाची विक्री केवळ 1,559 मे. टन होती. मात्र, यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच ऑक्सिजनची मागणीही वाढू लागली. ही मागणी ३० एप्रिलपर्यंत दिवसाला 8,000 मे. टनचा आकडाही पार करुन गेली आणि मेच्या पहिल्या आठवड्यातही यात वाढ कायम राहिली.

9 मे रोजी उच्चांक गाठल्यानंतर त्यानंतरपासून मेडिकल ऑक्सिजनची मागणी घटत गेली. सध्या रुग्णालयांमध्ये दररोजचा ऑक्सिजनचा पुरवठा सुमारे 8,000 मे.टनावर आला आहे. दैनंदिन रुग्णसंख्याही तीन लाखापेक्षा कमी येत आहे. 8 मे रोजी समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, जवळपास 50,000 कोरोना रुग्ण गंभीर होते. 14,500 हून अधिक रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर, 1.37 लाख रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर होते. दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधून ऑक्सिजनची सर्वाधिक मागणी होती.

First published:

Tags: Corona spread, Coronavirus cases, Oxygen supply