मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona Updates: ऑक्टोबर महिन्यात दररोज 1 कोटी जणांचं लसीकरण, 15 तारखेपूर्वीच होणार विश्वविक्रम

Corona Updates: ऑक्टोबर महिन्यात दररोज 1 कोटी जणांचं लसीकरण, 15 तारखेपूर्वीच होणार विश्वविक्रम

ऑक्टोबर महिन्यात दर दिवशी 1 कोटी नागरिकांचं (Daily 1 crore vaccination in India likely in October) लसीकरण करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे.

ऑक्टोबर महिन्यात दर दिवशी 1 कोटी नागरिकांचं (Daily 1 crore vaccination in India likely in October) लसीकरण करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे.

ऑक्टोबर महिन्यात दर दिवशी 1 कोटी नागरिकांचं (Daily 1 crore vaccination in India likely in October) लसीकरण करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : ऑक्टोबर महिन्यात दर दिवशी 1 कोटी नागरिकांचं (Daily 1 crore vaccination in India likely in October) लसीकरण करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे. त्यासाठी सरकार एकूण 28 कोटी लसी (Center to buy 28 crore vaccines) खरेदी करणार आहे. या लसी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांकडून खरेदी केल्या जाणार आहेत. याशिवाय बायोलॉजिकल-ई आणि झायडस कँडिला या कंपन्यांच्या लसीदेखील भारतात उपलब्ध होणार आहेत.

15 ऑक्टोबरपूर्वी रेकॉर्ड

देशात 100 कोटी लसीकरणाचा टप्पा 15 ऑक्टोबरपूर्वी पार करण्याचा सरकारचा मानस आहे. सध्याच्या लसीकरणाच्या वेगानुसार हा टप्पा 10 ते 12 ऑक्टोबरदरम्यानच पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर देशात फ्रंटलाईन वर्कर्स आणि कोविड वॉरियर्स यांच्या सन्मानार्थ जंगी सोहळा आयोजित केला जाणार आहे.

देशात आतापर्यंत 88 कोटीपेक्षा जास्त लसीकरण पूर्ण झालं आहे. 18 सप्टेंबर या दिवशी भारतात 2.5 कोटी कोरोना लसी देण्यात आल्या होत्या. आतापर्यंतचा हा विश्वविक्रम आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील 94 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असेल, असा अंदाज सरकारमधील सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. देशातील 94 कोटी नागरिकांना 188 कोटी डोस उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. भारतात गेल्या महिन्यात 23 कोटी जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. आतापर्यंतचा हा जगातील विक्रम मानला जात आहे.

हे वाचा - अरे बापरे! लसीकरणानंतर तोंड झालं वाकडं; कोरोना लशीचा दुष्परिणाम झाल्याचा दावा

वर्षाअखेर सर्व भारतीयांचं लसीकरण पूर्ण करण्याची घोषणा सरकारने केली होती. सध्याचा देशातील लसीकरणाचा वेग पाहता हे प्रत्यक्षात होईल, असा अंदाज आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, India