जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / IPL 2021: KKR च्या 2 खेळाडूंना कोरोनाची लागण, RCB विरुद्धच्या मॅचवर मोठं संकट

IPL 2021: KKR च्या 2 खेळाडूंना कोरोनाची लागण, RCB विरुद्धच्या मॅचवर मोठं संकट

IPL 2021: KKR च्या 2 खेळाडूंना कोरोनाची लागण, RCB विरुद्धच्या मॅचवर मोठं संकट

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे सोमवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणरी मॅच स्थगित होऊन नंतर खेळवली जाण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद, 3 मे: देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा फटका इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेला बसला आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही खेळाडूंना कोरनाची लागण झाली होती. त्यातच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. या कारणामुळे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) ही सोमवारी होणारी मॅच स्थगित होण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrier) या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. असं वृत्त ANI या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.  आता या दोन खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांच्या संपर्कात आलेल्या KKR च्या सर्व सदस्यांची आणि हॉटेलमधील स्टाफची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणरी मॅच स्थगित होऊन नंतर खेळवली जाण्याची शक्यता आहे.

जाहिरात

आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीपासून वेगवेगळ्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) देवदत्त पडिक्कल, दिल्ली कॅपिटल्सचा (DC) अक्षर पटेल, कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) नितिश राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे हे खेळाडू काही काळ आयसोलेशनमध्ये होते. त्यांचा आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर ते पुन्हा एकदा टीममध्ये दाखल झाले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पडसाद पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) दरम्यान देखील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं संपूर्ण स्पर्धा पुढ ढकलण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) घ्यावा लागला होता. तसंच इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही मालिका देखील कोरोनामुळे अर्धवट स्थगित झाली होती. दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ऑस्ट्रेलियन बोर्डानं दक्षिण आफ्रिका दौरा काही महिन्यांपूर्वी रद्द केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात