मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनावर भारी ठरतंय Cow milk! दुधातील खास प्रोटिनने व्हायरसला केलं ब्लॉक; संशोधकांचा दावा

कोरोनावर भारी ठरतंय Cow milk! दुधातील खास प्रोटिनने व्हायरसला केलं ब्लॉक; संशोधकांचा दावा

दूध हे संपूर्ण पोषक तत्व आहे, जे शरीराच्या गरजेनुसार कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियमची गरज पूर्ण करते. निरोगी राहण्यासाठी दुधाचे अनेक फायदे आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

दूध हे संपूर्ण पोषक तत्व आहे, जे शरीराच्या गरजेनुसार कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियमची गरज पूर्ण करते. निरोगी राहण्यासाठी दुधाचे अनेक फायदे आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

गाईचं दूध कोरोनाव्हायरसविरोधात दोन पद्धतीने फायदेशीर ठरत आहे.

मुंबई, 18 मार्च :  गायीचं दूध (Cow Milk) आरोग्यासाठी पोषक मानलं जातं. आयुर्वेदात गायीच्या दुधाचे अनेक फायदे सांगितले आहेत. गायीचं दूध हा परिपूर्ण आहार मानला जातो. आता हेच दूध कोरोनापासून बचाव करू शकतं. हेच दूध आता कोरोनावरही भारी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाविरोधात लढण्याची ताकद गाईच्या दुधात आहे, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनात दिसून आलं आहे.

गायीचं दूध कोरोनापासून बचाव करू शकतं, असा दावा मिशिगन युनिव्हर्सिटीतल्या (University of Michigan) संशोधकांनी त्यांच्या संशोधनाच्या आधारे केला आहे. गायीच्या दुधामुळे कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होतो. तसंच, यामुळे ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, त्यांच्या शरीरातल्या विषाणूची संख्या वाढण्यापासून रोखता येते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, गायीच्या दुधात बोव्हाइन लॅक्टो फेरिन प्रोटीन (Bovine Lactoferrin Protein) असतं. विषाणूला रोखण्याची क्षमता या प्रोटीनमध्ये असते. त्यामुळे कोविड-19 विषाणूची शरीरात वाढणारी संख्या रोखता येते. हे खास प्रोटीन अनेक विषाणू आणि जंतूंपासून संरक्षण करण्यास मदत करतं. हे विशेष प्रोटीन ओरली अर्थात तोंडाद्वारे देता येऊ शकते. तसंच यामुळे संसर्गाची तीव्रता कमी केली जाऊ शकते.

हे वाचा -टेस्टिंग कमी तरी जगभरात वाढतोय कोरोना; 8 दिवसात 8 पट रुग्ण वाढ WHO चा alert

याबाबत मुख्य संशोधक जोनाथन सेक्सटन म्हणाले, "गायीच्या दुधात असलेलं विशेष प्रकारचं प्रोटीन (Protein) कोरोनाव्हायरस (Coronavirus) रोखतं. त्यामुळे हा विषाणू पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. ही एक प्रकारची अ‍ॅंटिव्हायरल संरक्षण यंत्रणा आहे. सध्याच्या काळात या प्रकारचे आजार रोखण्यासाठी काही विशिष्ट उपचार उपलब्ध असले, तरी ते महाग आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत या प्रोटीनला विशेष महत्त्व आहे. ज्या भागात लस उपलब्ध असूनही त्यातून नवा स्ट्रेन (Strain) वाचतो आणि फैलावतो, अशा भागातल्या व्यक्तींवर या प्रोटीनच्या मदतीनं उपचार केले जाऊ शकतात"

हे वाचा - निर्बंध शिथिल करणं पडू शकतं महाग, जगभरात Omicron ची नवी लाट, चीनमध्ये Lockdown

डेअरी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, गायीच्या दुधातल्या प्रोटीनच्या मदतीनं अशा आजारांना रोखणं, तसंच त्यावर इलाज करणंदेखील शक्य आहे, असं वृत्त डेली मेलने दिलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Cow science, Lifestyle