जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / टेस्टिंग कमी तरी जगभरात पुन्हा वाढतोय कोरोना; 8 दिवसात 8 पट रुग्ण वाढल्याने WHOने केलं Alert

टेस्टिंग कमी तरी जगभरात पुन्हा वाढतोय कोरोना; 8 दिवसात 8 पट रुग्ण वाढल्याने WHOने केलं Alert

टेस्टिंग कमी तरी जगभरात पुन्हा वाढतोय कोरोना; 8 दिवसात 8 पट रुग्ण वाढल्याने WHOने केलं Alert

Coronavirus Update: गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णसंख्येत आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चीनपाठोपाठ दक्षिण कोरिया, हाँगकाँगमध्ये हाहाकार उडाला आहे. निर्बंध शिथिल करणं अंगाशी येऊ शकतं का?

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    दिल्ली, 17 मार्च: जगभरात कोरोनाचे रुग्ण (corona cases on rise worldwide) कमी झाले होते. त्यामुळे आता कोरोना महामारी संपली, अशी आशा वाटू लागली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून चीन (china), दक्षिण कोरिया (south korea) आणि आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. चीनमधली परिस्थिती गंभीर होत चालली असून, रुग्णालयं उभारली जात आहेत. काही शहरांमध्ये लॉकडाउनसुद्धा (lockdown in china) लागू करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, WHO ने वाढत्या केसेसवर चिंता व्यक्त करून आशियातल्या काही भागांमध्ये, लसीकरण वाढवण्याचं आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचं आवाहन केलं आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, की कोरोनाच्या चाचण्या कमी असूनही जागतिक स्तरावर रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाच्या उद्रेकात वाढ होईल, असं अपेक्षित आहे. सावध व्हा..! भारताच्या डोक्यावर पुन्हा एकदा Corona चं सावट? समोर आली नवी अपडेट ही वाढ अशा भागात होण्याची शक्यता जास्त आहे, ज्या भागात कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवले गेले आहेत, असं ते म्हणाले. या संदर्भातलं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे. 8 दिवसात 8 पट वाढ डब्ल्यूएचओच्या कोविड-19 तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांच्या मते, गेल्या आठवड्यात 1 कोटी 10 लाखांपेक्षा अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णसंख्येत आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही रुग्णसंख्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटमुळे (omicron variant) वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दक्षिण कोरियामध्ये कोरोनामुळे हाहाकार दक्षिण कोरियामध्ये (South Korea) गुरुवारी (17 मार्च) कोरोनाचे 6 लाखांहून अधिक नवीन रुग्ण (new corona patients) आढळले. आतापर्यंत जगातल्या कोणत्याही देशात एकाच दिवसात कोरोना संसर्गाची (corona infection) इतकी प्रकरणं समोर आलेली नाहीत. ही दिलासादायक बाब आहे, की नवीन प्रकरणांची विक्रमी संख्या असूनही दक्षिण कोरिया हा व्हायरसमुळे सर्वांत कमी मृत्यूदर असलेल्या देशांपैकी एक आहे. सर्वसाधारणपणे कोरोना संसर्गाचा दर जसजसा वाढत जातो, तसतसा त्याचा मृत्युदरही वाढतो; मात्र दक्षिण कोरियामध्ये असं दिसून आलं नाही.

    Corona Virus Updates: जूनमध्ये भारतात Corona ची चौथी लाट?  WHO चा मोठा इशारा

     कोरियाच्या व्हायरस फायटर्सचं म्हणणं आहे, की देशात मोठ्या प्रमाणावर सातत्याने कोविड चाचण्या होत असल्याने संसर्गाची इतकी प्रकरणं समोर आली आहेत. कोरियन प्रशासनाने संसर्गग्रस्त व्यक्तीची प्रकृती गंभीर होण्यापूर्वी जोखीम असलेल्या प्रकरणांची ओळख पटवून रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात