Home /News /coronavirus-latest-news /

'कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटपुढे लसही ठरणार निरुपयोगी? बराच काळ राहणार विषाणूचा धोका'

'कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटपुढे लसही ठरणार निरुपयोगी? बराच काळ राहणार विषाणूचा धोका'

डॉ. डेव्हिड नाबारो (Dr David Nabarro) यांनी म्हटलं, की भविष्यात लसींनाही चकमा देणाऱ्या कोरोना व्हेरिएंटची (Covid Variants Evading Vaccines) संख्या वाढू शकते.

    नवी दिल्ली 14 सप्टेंबर : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) विशेषदूत डॉ. डेव्हिड नाबारो (Dr David Nabarro) यांनी म्हटलं, की भविष्यात लसींनाही चकमा देणाऱ्या कोरोना व्हेरिएंटची (Covid Variants Evading Vaccines) संख्या वाढू शकते. त्यांनी म्हटलं, की कोरोनाविरूद्ध (Coronavirus) संपूर्ण जगाचं युद्ध अजूनही सुरू आहे आणि प्रत्येकाला ही लढाई एकत्रितपणे लढावी लागेल. खरं तर, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर (Delta Variant) लसीच्या (Corona Vaccine) परिणामाबाबत जगभरात संशोधन चालू आहे. काही अलीकडील संशोधनात असं म्हटलं आहे की डेल्टा व्हेरिएंटवर लसीचा परिणाम तुलनेने कमी आहे. डॉ. डेव्हिड नाबारो म्हणाले, की लसीचाही परिणाम न होणाऱ्या व्हेरिएंटची संख्या वाढू शकते. कारण जगातील मोठ्या भागांमध्ये अजूनही लसीकरण कमीच आहे. त्यांनी कोविड लसीच्या बूस्टर डोससंदर्भात बोलताना हा मुद्दा मांडला आहे. त्यांनी यावर जोर दिला आहे की श्रीमंत देशांनी लसीच्या बूस्टर डोसची प्रतीक्षा केली पाहिजे, कारण सध्या गरीब देशांमध्येही लसीचा पुरवठा करणं आवश्यक आहे. भारतीयांसाठी खूशखबर! COVAXIN ला या आठवड्यात WHO कडून मंजुरी मिळण्याची शक्यता युरोपियन देश कोरोना लसीचे बूस्टर डोस तयार करण्यात गुंतले आहेत, त्यापैकी ब्रिटन देखील एक आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटना बूस्टर डोस कार्यक्रम सुरू न करण्याचं सतत आवाहन करत आहे. भारतातही, टॉप व्हायरलॉजिस्ट गगनदीप कांग म्हणाले होते की, लसीचा परिणाम डेल्टा व्हेरिएंटच्या विरोधातही आहे, त्यामुळे लोकांनी बूस्टर डोससाठी घाई करू नये. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, की बूस्टर डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणारच नाही अशी कोणतीही हमी देता येत ​​नाही. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! पुतियान शहरातील नागरिकांना प्रवास करण्यास बंदी अमेरिकेत जो बायडन प्रशासनानं मात्र कमी रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या लोकांना बूस्टर डोस देण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेनं सर्व देशवासियांसाठी 20 सप्टेंबरपासून बूस्टर कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याची घोषणा केली आहे. तर, मिनियापोलिसमधील मिनेओस्टा विद्यापीठातील संसर्गजन्य रोग संशोधन आणि धोरण केंद्राचे संचालक आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचे सल्लागार मायकल ओस्टोल्म म्हणतात की, माझ्या मते, जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार सतत दिसून येत आहे. हा प्रसार पुन्हा वेगाने कमी होईल आणि मग यावर्षी हिवाळ्यात आपल्याला पुन्हा एक नवीन लाट आल्याचे दिसेल. आता हा विषाणू लोकांमध्येच राहू शकतो.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या