नवी दिल्ली, 18 एप्रिल : लोकांना तब्बल 500 कोटी रुपयांचा चूना लावणारी स्कीम सरगना आणि कल्पतरू ग्रुप ऑफ कंपनीचे (Kalpataru group of companies) मालक जय किशन सिंह राणा यांचा कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. हा आरोपी तब्बल 50 चिट फंड आणि रियल एस्टेट प्रकरणात वॉन्टेंड होता. पोलीस 2016 पासून राणा यांचा शोध घेत होती. 54 वर्षीय राणाने शुक्रवारी रात्री मथुरा येथील एका रुग्णालयात जीव सोडला.
रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राणा शुक्रवारी सकाळी रुग्णालयात दाखल झाले होते आणि साधारण रात्री 1 वाजता त्याचा मृत्यू झाला. एका डॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हा त्याला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याची प्रकृती नाजूक होती. त्याला जेके सिंहच्या नावाने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मथुराचे एसएसपी गौरव ग्रोवरने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की राणा विरोधात आयपीसी कलम 420 आणि 406 अंतर्गत 46 एफआयआर दाखल आहे.
हे ही वाचा-कोरोनाविरोधातील लढ्यासाठी सरकार सज्ज, आरोग्य सुविधांबाबत 2 मोठ्या घोषणा
कसा द्यायचा लोकांना धोका
फराह ठाण्याचे प्रमुख रमेश यांनी सांगितलं की, राणा अनेक वर्षांपासून फरार होता. 2018 मध्ये त्याच्या नावावर 15000 रुपयांचं बक्षीस घोषित केलं होतं. त्याला फरार घोषित करण्यात आलं होतं आणि त्याच्याविरोधात कोर्टात 23 प्रकरणात चार्टशीट दाखल करण्यात आली होती. यावर खोट्या इन्वेस्टमेंट स्किम आणि फ्लॅट देण्याच्या नावावर लोकांसोबत फसवणूक करण्याचा आरोप होता.
पोलिसांच्या सूत्रानुसार राणाने एका प्रमूख बँकेकडून लोक घेतलं होतं. आणि जेव्हा तो हे लोन फेडू शकला नाही तेव्हा त्याने मथुरामधील त्याच्या बंगल्याची निलामी केली होती. सोबतच त्याच्यावर इनकम टॅक्स डिपार्टमेंटचे 80 कोटी रुपये देणे शिल्लक होते. एसपी आरएस राय यावर म्हणाले की, दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने तेथे दाखल केलेल्या प्रकरणात राणाची संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला होता. अनेक लोकांना राणाच्या प्रोजेक्टसमध्ये पैसे गुंतवले होते. आणि त्याबदल्यान कंपनीने त्यांना जमीन आणि फ्लॅट देण्याचं वचन दिलं होतं. राणा याचं नेटवर्क पंजाब, हरियाण, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पसरलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.