• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • Covid रुग्णालयातून बायकोचं तर विलगीकरण कक्षातून नवऱ्याचं पलायन, 4 तासांच्या प्रयत्नानंतर पकडण्यात यश

Covid रुग्णालयातून बायकोचं तर विलगीकरण कक्षातून नवऱ्याचं पलायन, 4 तासांच्या प्रयत्नानंतर पकडण्यात यश

चित्रपटात घडतो तसा नाटयमय पाठलाग करून चार तासांत या जोडप्याला ताब्यात घेण्यात आलं. यात पोलिसांसह स्थानिक आमदार, प्रशासन सगळ्यांनीच आपापल्या परीनं सहभाग घेतला.

  • Share this:
शिलाँग, 29 मे: कोविड-19ची (Covid-19) लागण झाल्यावर लक्षणांच्या प्रमाणानुसार रुग्णांना रुग्णालयात (Hospital) किंवा संस्थात्मक (Institutional) अथवा घरी विलगीकरणात (Home Quarantine) ठेवून उपचार दिले जातात. मात्र या आजाराबद्दलचे गैरसमज, रुग्णालयात किंवा विलगीकरणात घरातल्यांपासून दूर राहण्याची भीती अशा विविध कारणांमुळे अनेक रुग्ण पळून गेल्याच्या घटना घडत असतात. नुकतीच शिलॉंगमध्येही (Shillong) अशीच एक घटना घडली. इथं कोविड-19 वर उपचार सुरू असणाऱ्या एका जोडप्यानं कोविड रुग्णालय आणि विलगीकरण कक्षातून पळ काढला. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ माजली. अखेर चित्रपटात घडतो तसा नाटयमय पाठलाग करून चार तासांत या जोडप्याला ताब्यात घेण्यात आलं. यात पोलिसांसह स्थानिक आमदार, प्रशासन सगळ्यांनीच आपापल्या परीनं सहभाग घेतला. या जोडप्यातील महिलेला शिलॉंग सिव्हिल कोविड रुग्णालयात (Shillong Civil Covid Hospital) दाखल करण्यात आलं होतं. तर तिचा पती सौम्य लक्षणं असल्यानं लाइटुमख्राह मार्केटमधील संस्थात्मक विलगीकरणात होता. ही महिला शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास आपल्या पतीला भेटण्यासाठी रुग्णालयातून पळून गेली. तर पतीही त्याच सुमारास विलगीकरण कक्षातून पळाला. त्यांच्या पलायनाची खबर पोलिसांसह प्रशासनाला देण्यात आली. पोलिसांनी स्थानिक आमदार आणि एमडीसी यांना मदत करण्यास सांगितलं. हे वाचा-Saline Gargle : फक्त गुळण्या करा आणि तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ओळखा एखाद्या चित्रपटात शोभावी तशी ही घटना घडल्याचं आमदार डॉ. एम आमपरीन लिंगडोह (Dr. M. Ampareen Lyngdoh) यांनी सांगितलं. ‘या जोडप्याच्या मित्रानं तर त्याला तपासणीसाठी नेलं जात असताना चक्क अॅम्ब्युलन्समधून उडी मारली. सिव्हिल हॉस्पिटलमधून बायको गायब झाली ती ‘क’ श्रेणीत होती तर नवरा ‘ब’ श्रेणीत होता. दोघांना फार तीव्र लक्षणे नव्हती. पण त्यांना खोकला येत होता आणि तरीही त्यांनी मास्क घातला नव्हता. नवराही विलगीकरण कक्षातून पळून गेल्याचं लक्षात येताच पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांना स्थानिक आमदार आणि एमडीसी यांना मदत करण्यास सांगितलं. त्यानंतर दोघांच्या शोधासाठी धावपळ सुरू झाली. त्यांचा माग काढण्यासाठी चौकशी सुरू झाली. संध्याकाळी सहा वाजता सुरू झालेला हा पाठलाग चार तासांनी संपला. आधी नवऱ्याला ताब्यात घेतलं आणि नंतर त्या महिलेला शोधण्यातही यश आलं. या दोघा नवरा बायकोला वेगळं रहायचं नव्हतं, त्यांना एकत्र रहायचं होतं, त्यामुळं त्यांनी पळ काढल्याचं नंतर चौकशीत निष्पन्न झालं. आता त्या जोडप्याला एकत्र ठेवण्यात आलं आहे,’ अशी माहिती लिंगडोह यांनी दिली. हे वाचा-UK मध्ये तिसऱ्या लाटेचा धोका, भारतावर काय होणार परिणाम? विलगीकरण सुविधांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याऐवजी लोकांच्या मानसिक आरोग्याकडे (Mental Health) लक्ष देणं आवश्यक आहे, असं लिंगडोह यांनी सांगितलं. ‘कोविडवरील उपचारांमध्ये अनेक बाबींची आवश्यकता असते. यात केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे. बर्‍याच लोकांनी मानसिक त्रास (Mental Problems) होत असल्याचं, भीती (Fear) वाटत असल्याची व्यथा मांडल्याचं लिंगडोह यांनी सांगितलं. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) प्रेस्टोन तीनसॉईंग (Prestone Tynsoing) म्हणाले, ‘कदाचित या जोडप्याला काही मानसिक समस्या भेडसावत असाव्यात. माणूस म्हणून आपण वास्तविकता आणि परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. कोणाचीही कोरोना चाचणी सकारात्मक आल्यास त्यांना किमान 10 दिवसांसाठी रुग्णालयात किंवा गृहविलगीकरणात राहणं आवश्यक आहे. त्यातून कोणी पाच-सहा दिवसातच बाहेर आलं तर त्यांच्या शरीरात विषाणू असल्यानं इतरांना ते संसर्ग पोहोचवू शकतात. त्यामुळं याबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत.’ कोविड उपचारांसह रुग्णांच्या मानसिक स्वास्थाची काळजी घेण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करतानाच त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
First published: