गुजरात, 16 एप्रिल : बनावटी RTPCR टेस्टच्या साहाय्याने महाराष्ट्रातून गुजरातमध्ये येणाऱ्या नागरिकांना गुजरातमधील वलसाड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्रातून गुजरातला येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी गुजरातमधील भिलाड चेक पोस्टवर केली जाते. येथे मेडिकल टीमव्यतिरिक्त पोलिसांची टीमदेखील उपस्थित असते. वलसाड पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, अनेक लोक टेस्ट न करता केवळ बनावटी रिपोर्टच्या आधारावर गुजरातमध्ये दाखल होत आहेत. त्यानंतर पोलिसांनी गुजरातमध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या RTPCR टेस्ट वरील क्यूआर कोडला डिकोड करणे सुरू केलं. क्यूआर कोडमध्ये टेस्ट करणाऱ्या व्यक्तीचं नाव, नंबर, पत्ता आदी माहिती असते. जेव्हा क्यूआर कोड डिकोड करीत माहिती काढली तेव्हा टेस्ट कोणा दुसऱ्याची होती आणि त्या रिपोर्टच्या आधारावर गुजरात येणारी व्यक्ती वेगळी होती. हे ही वाचा- 50 प्रवासी असलेल्या ट्रॅव्हल्स बस चालकालाच कोरोना, वृत्ताने एकच खळबळ त्यानंतर वलसाड पोलिसांनी 13 पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. ज्या व्यक्तींना पकडण्यात आलं आहे त्यात एक बस ड्रायव्हर असून जो या प्रकारच्या रिपोर्टमध्ये गोंधळ घालून बनावटी रिपोर्ट तयार करीत होता. ज्यासाठी तो चांगलेच पैसेही उकळत होत. सध्या लॅबमध्ये टेस्ट होत नाही आणि प्रवाशांना प्रवास करता यावे, यासाठी अशा प्रकारच्या चुकीचा वापर केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनेकदा वारंवार प्रवास करणारी व्यक्ती पुन्हा पुन्हा चाचणी टाळत असून बनावटी रिपोर्टची मदत घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.