Home /News /coronavirus-latest-news /

Corona Cases in India: कोरोनाची दुसरी लाट बनली आणखी घातक; महाराष्ट्रासह या राज्यांची चिंता वाढली

Corona Cases in India: कोरोनाची दुसरी लाट बनली आणखी घातक; महाराष्ट्रासह या राज्यांची चिंता वाढली

महाराष्ट्रात कोरोना स्थिती बिकट (Corona pandemic) बनत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशातील कोरोना हॉटस्पॉट (Corona Hotspot) बनला आहे. कोरोना रुग्णांच्या (Corona cases in maharashtra) वाढीमध्ये सोमवारी काही प्रमाणात घट झाल्यानंतर, मंगळवारी पुन्हा एकदा राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 60 हजाराहून अधिक रुग्णांची भर पडली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 14 एप्रिल: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात कोरोना स्थिती (Corona Pandemic) आणखी गंभीर बनत चालली आहे. आतापर्यंत देशातील अनेक राज्यांत कोरोना विषाणूने आपला विळखा घट्ट केला आहे. देशातील पाच पेक्षा जास्त राज्यात मंगळवारी एकाच विक्रमी कोरोना रुग्णांची (Corona Cases in India) भर पडली आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात कोरोना स्थिती बिकट बनत चालली आहे. देशात महाराष्ट्र बनला कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट महाराष्ट्रात कोरोना स्थिती बिकट (Corona pandemic) बनत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशातील कोरोना हॉटस्पॉट (Corona Hotspot) बनला आहे. कोरोना रुग्णांच्या (Corona cases in Maharashtra) वाढीमध्ये सोमवारी काही प्रमाणात घट झाल्यानंतर, मंगळवारी पुन्हा एकदा राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 60 हजाराहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यात 15 दिवसांचा कडक  कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. यावेळी लॉकडाउनप्रमाणे कडक निर्बंध लादण्यात आले नाहीत. मात्र राज्यात लोकांच्या हालचालींवर पूर्णपणे बंदी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यात काल (मंगळवारी) 18 हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत एकूण संक्रमित होणाऱ्या लोकांची संख्या 7 लाखांवर गेली आहे. तर 9,309 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल लखनऊमध्ये सर्वाधिक 5382 रुग्ण आढळले आहेत. तर अलाहाबादमध्ये 1856, वाराणसीमध्ये 1404 आणि कानपूरमध्ये 1271 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. गुजरात गुजरातमध्ये काल 6699 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात संक्रमित लोकांची एकूण संख्या 360206 वर पोहचली आहे. काल एकूण 67 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे आता एकूण मृतांची संख्या 47922 वर पोहचली आहे. राज्यात कोरोना रोखण्यासाठी रात्रीच्या जमावबंदी सोबतचं अनेक जिल्ह्यांत अनेक निर्बंध लागू केले आहेत. (हे वाचा- Maharashtra Lockdown : कामगार, रिक्षाचालकांना मिळणार पैसे, मुख्यमंत्र्यांकडून 5476 कोटींचे पॅकेज जाहीर) मध्य प्रदेश आणि दिल्ली या दोन राज्यांमध्ये कोरोना विषाणूची स्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. काल मध्यप्रदेशात एकूण 8998 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण मृतांचा आकडा 4261 वर पोहचला आहे. सध्या राज्यात अॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या 43539 आहे. दिल्लीतही काल 13 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूशी लढण्यासाठी दिल्लीत रात्रीची जमावबंदीसोबतच कोरोना चाचण्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona hotspot, Corona spread, Corona updates, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Covid-19, Maharashtra

    पुढील बातम्या