मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Virus पासून दूर राहायचंय? मग फ्रीजरमधले हे अन्नपदार्थ आत्ताच फेकून द्या

Corona Virus पासून दूर राहायचंय? मग फ्रीजरमधले हे अन्नपदार्थ आत्ताच फेकून द्या

तुम्हीही रेफ्रिजरेटर (Refrigerator) किंवा फ्रीझरमध्ये (Freezer) ठेवलेलं मांस खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, या उत्पादनांवर (Fish Product) SARS-CoV-2 हा विषाणू सुमारे 30 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो, असं एका अभ्यासात दिसून आलं आहे.

तुम्हीही रेफ्रिजरेटर (Refrigerator) किंवा फ्रीझरमध्ये (Freezer) ठेवलेलं मांस खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, या उत्पादनांवर (Fish Product) SARS-CoV-2 हा विषाणू सुमारे 30 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो, असं एका अभ्यासात दिसून आलं आहे.

तुम्हीही रेफ्रिजरेटर (Refrigerator) किंवा फ्रीझरमध्ये (Freezer) ठेवलेलं मांस खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, या उत्पादनांवर (Fish Product) SARS-CoV-2 हा विषाणू सुमारे 30 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो, असं एका अभ्यासात दिसून आलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 13 जुलै : गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोरोनानं (Corona) जगभरातल्या अनेक देशांना वेठीस धरलं आहे. कोरोनाच्या लाटांमुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हॅरिएंट्समुळे (Variant) संसर्ग वेगानं पसरला. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जगभरात सातत्यानं संशोधन सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोरोनाच्या अनुषंगानं एक नवीन माहिती समोर आली आहे. रेफ्रिजरेटर (Refrigerator) आणि फ्रीझरमध्ये (Freezer) ठेवलेलं मांस (Meat) आणि माशांच्या उत्पादनांवर (Fish Product) SARS-CoV-2 हा विषाणू सुमारे 30 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो, असं एका अभ्यासात दिसून आलं आहे. याविषयीची माहिती देणारं वृत्त `फर्स्ट पोस्ट`ने प्रसिद्ध केलं आहे.

जगभरात कोरोनाचा कहर अद्याप सुरूच आहे. भारतात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तर रुग्णसंख्येत सातत्यानं चढ-उतार दिसून येत आहे. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, असं `डब्ल्यूएचओ`नं सांगितलं आहे. त्यातच कोरोनाबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनातून एक नवी बाब समोर आली आहे. कोरोना होण्यास SARS-CoV-2 हा विषाणू (Virus) कारणीभूत ठरतो. हा विषाणू रेफ्रिजरेटर आणि फ्रीझरमध्ये साठवण्यात येणारं मांस आणि माशांच्या उत्पादनांवर सुमारे 30 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो, असं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. आग्नेय आशियामध्ये (Southeast Asia) कम्युनिटी ट्रान्समिशनपूर्वी (Community Transmission) कोविड-19चा (Covid-19) संसर्ग होत असल्याचं समजल्यानंतर संशोधकांनी याविषयी अभ्यास केला.

संशोधकांनी मांस आणि माशांची उत्पादनं रेफ्रिजरेटर (4 अंश सेल्सिअस) आणि फ्रीजर (-20 अंश सेल्सिअस) अशा दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या तापमानात साठवली. चिकन, बीफ, पोर्क, साल्मन आणि SARS-CoV-2 प्रमाणेच स्पाइक असलेले सरोगेट व्हायरस (Surrogate virus) वापरून हे संशोधन करण्यात आलं. अप्लाइड अ‍ॅंड एन्व्हायर्न्मेंटल मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये हे संशोधन नुकतंच प्रकाशित झालं आहे.

साधं दही खाऊनही कमी होऊ शकतं वजन; Weight loss साठी कसं फायद्याचं ठरतं पाहा

या अभ्यासासाठी संशोधकांनी लिपीड एन्व्हलपसह एक RNA विषाणू, दोन प्राण्यांमधला कोरोनाव्हायरस, मुरिन हिपॅटायटिस विषाणू आणि संसर्गक्षम गॅस्ट्रोएन्टेरिटीस विषाणू सरोगेट म्हणून वापरले. हे तीन विषाणू यापूर्वी SARS-CoV-2 साठी सरोगेट म्हणून वापरले गेले आहेत. सामान्यतः अतिथंड तापमानापेक्षा रेफ्रिजरेशनमध्ये त्यांच्या संख्येत जास्त घट होत असल्याचं दिसून आलं आहे. तसंच यासाठी वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांनुसार त्यांच्या संख्येतली घटदेखील बदलते, असं संशोधकांना दिसून आलं.

`फ्रीजमध्ये 30 दिवस मांस साठवता येत नसलं, तरी ते फ्रीजरमध्ये ते जास्त काळ साठवता येतं. या विषाणूचं संवर्धन त्या कालावधीनंतरही होऊ शकतं, असं आम्हाला आढळून आलं आहे. SARS-CoV-2 पसरत असलेल्या भागातली पॅकेज्ड मीट प्रॉडक्ट्स (Packaged Meat Products) हे विषाणूचे स्रोत असू शकतात, असं आग्नेय आशियातल्या कम्युनिटीजच्या अहवालात सुचवलं आहे. त्यामुळे अशा वातावरणात तत्सम विषाणू टिकू शकतात की नाही याचा शोध घेणं हे आमचं ध्येय होतं. SARS-CoV-2 हा विषाणू आतड्यात आणि श्वसनमार्गात पुनरुत्पादन करू शकतो. त्यामुळे हे संशोधन महत्त्वाचं होतं,` अशी माहिती यूएसमधल्या कॅम्पबेल युनिव्हर्सिटीतल्या सहाय्यक प्राध्यापक आणि या अभ्यासाच्या प्रथम लेखक एमिली एस. बेली यांनी दिली.

`कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पॅकेजिंगपूर्वी या पदार्थांचं निर्जंतुकीकरण करणं, तसंच या गोष्टींकडे पुरेसं लक्ष देणं आवश्यक आहे,` असं संशोधकांनी सांगितलं. `खाद्यपदार्थ, अन्नप्रक्रियेसाठीचा पृष्ठभाग, कामगारांचे हात आणि चाकूसारख्या वस्तू दूषित होऊ नयेत यासाठी सतत प्रयत्न करणं आवश्यक आहे,` असं संशोधकांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Corona virus in india, Health Tips