मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

साधं दही खाऊनही कमी होऊ शकतं वजन; Weight loss साठी कसं फायद्याचं ठरतं पाहा

साधं दही खाऊनही कमी होऊ शकतं वजन; Weight loss साठी कसं फायद्याचं ठरतं पाहा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Benefits of Curd for weight loss : दह्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटिन आढळतात आणि हे प्रोटिन वजन कमी करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

मुंबई, 13 जुलै : दही खाणं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे (Benefits of Curd) . दही नियमित खाल्ल्याने पोटात होणारी जळजळ थांबते आणि पोटाला थंडावा मिळतो. दही आपल्या हाडांसाठीही उपयुक्त आहे. दह्यातील कॅल्शियम आपल्या दात आणि नखांना मजबूत करतं. याशिवाय दह्याच्या नियमित सेवनानं वाढलेलं वजन कमी करण्यासही मदत होते. दह्यात लॅक्टोबॅसिलस बल्गेरिकस (Lactobacillus bulgaricus) नावाचे बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया डिस्पेप्सिया (dyspepsia) कमी करण्यास मदत करतात. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटिन आढळतात आणि हे प्रोटिन वजन कमी करण्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात (Benefits of Curd for weight loss) दही तयार करताना किण्वन प्रक्रिया वापरली जाते. या प्रक्रियेत दुधातील घन घटक पदार्थ द्रव पदार्थापासून वेगळा केला जातो या घन पदार्थामुळेच घट्ट आणि भरपूर प्रोटिननीयुक्त असं दही तयार होतं. 1 औंस दह्यात 12 ग्रॅम प्रोटिन असतं. त्यामुळे प्रोटिनयुक्त दह्याचा आहारात समावेश केल्याने तुमचं पोट जास्त काळ भरलेलं ठेवण्यास मदत होईल आणि तुमची भूक नियंत्रणात राहील. दही मसल्स बारीक ठेवण्यास मदत करतं, त्यामुळे पोटावरील जास्तीची चरबी कमी होते. अन्न नीट पचन न झाल्यास वजन वाढतं. अपचन हे वजन वाढण्यामागील मुख्य कारणांपैकी एक आहे. दह्यामधील बॅक्टेरियाचं प्रमाण तुमच्या आतड्यांचं कार्य सुधारण्यास मदत करतं, ज्यामुळे अन्नाचं योग्य पचन होतं.  हे वाचा - Stomach Gas : गॅसच्या समस्येने त्रस्त आहात? पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी करा हे घरगुती उपाय पौष्टिक दुग्धजन्य पदार्थ असलेल्या दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम (calcium) असतं. ते हाडांची ताकद वाढवण्यास मदत करतं. तसंच दही आपल्या शरीरातील थर्मोजेनेसिसची (Thermogenesis) प्रक्रिया सुधारण्यास मदत करतं ज्यामुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो. दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन बी-2, पोटॅशियम (potassium) आणि मॅग्नेशियमसारखे (magnesium ) महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे सर्व घटक शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढीसाठी आवश्यक असतात. हे आवश्यक सर्व पोषक घटक दही तयार करताना दुधापासून मिळतात. मात्र, दुधापेक्षा दही लवकर पचतं. ही पोषकतत्त्वं तुमच्या मूत्राशयापर्यंत पोहोचणाऱ्या पेशींमधून जास्त पाणी सोडतात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. हे वाचा - Kidney Stone Stomach Pain : आता त्रास सहन करू नका; 'हे' आहेत किडनी स्टोनमुळे होणाऱ्या पोटदुखीवर उपाय तुमच्या रोजच्या आहारामध्ये डेअरी प्रॉडक्ट्सचा समावेश केल्यास वजन कमी करण्यास ते फायद्याचं ठरू शकतं. पण, ज्या व्यक्तीला लॅक्टोजचा त्रास होतो, अशा व्यक्तींसाठी मात्र आहारात डेअरी प्रॉडक्ट घेणं, त्रासदायक ठरू शकतं. ज्यांना लॅक्टोज पचत नाही, अशा व्यक्तींसाठी दही हाच दुग्धजन्य पदार्थ उपयुक्त ठरतो. दही हे किण्वन प्रक्रियेद्वारे तयार केलं जातं आणि त्या दह्यामध्ये असलेले बॅक्टेरिया लॅक्टोजचं लॅक्टिक अॅसिडमध्ये रूपांतर करतात, त्यामुळे दही हे लॅक्टोज न पचणाऱ्या व्यक्तींसाठीही उपयुक्त ठरतं. दह्यामध्ये कमी कॅलरीज असतात आणि ते तुमच्या मेटाबॉलिझम लेव्हलला (metabolism level) गती देतात. एक वाटी दही इतक्या प्रोटिन आणि इतर पोषकतत्त्वांनीयुक्त असतं की त्यामुळे तुमची भूक भागते. तुम्ही ताजा मध, शेंगदाणे किंवा इतर भाज्या घालून घरी दही सॅलड तयार करू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता.
First published:

Tags: Health, Lifestyle

पुढील बातम्या