मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /ठरलं! 'या' तारखेला जगाला मिळणार पुण्याची मेड इन इंडिया लस, सीरम कंपनीचा दावा

ठरलं! 'या' तारखेला जगाला मिळणार पुण्याची मेड इन इंडिया लस, सीरम कंपनीचा दावा

त्यामुळे DCGI (Drugs Controller General of India)ने परवानगी दिली की लगेच चाचण्यांना सुरूवात करू असं सीरमने म्हटलं आहे. पुण्यात या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्या तात्पुरत्या थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता चाचण्यांचा मार्ग मोकळा झालाय.

त्यामुळे DCGI (Drugs Controller General of India)ने परवानगी दिली की लगेच चाचण्यांना सुरूवात करू असं सीरमने म्हटलं आहे. पुण्यात या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्या तात्पुरत्या थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता चाचण्यांचा मार्ग मोकळा झालाय.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हायरस लसच्या 100 कोटी डोसच्या उत्पादनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन (Bill and Melinda Gates Foundation) आणि गवी (Gavi) यांच्याशी करार केला आहे.

पुणे, 11 ऑगस्ट : भारतात कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या वेगानं वाढत आहे. दुसरीकडे जास्तीत जास्त टेस्टिंगवरही भर दिला जात आहे. यातच कोरोनाच्या लशीसाठी भारतीय कंपन्या ट्रायल करत असताना पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) दावा केला आहे की, डिसेंबरपर्यंत कोरोनाला हरवणारी लस उपलब्ध होणार आहे. दोन महिन्यांत कंपनी लशीच्या किंमतीबाबत माहिती देणार आहे.

CNBC-TV18 शी बोलताना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर्श पूनावाला म्हणाले की, या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूची लस येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. ते म्हणाले की दोन महिन्यांत आम्ही या लसीची किंमत जाहीर करू. अदार पूनावाला असेही म्हणाले की, अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठासमवेत (Oxford University) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कोरोना व्हायरस लस तयार करीत आहे, ज्याचे टेस्ट रिझल्ट चांगले आले आहेत.

वाचा-10 दिवसांनंतर कोरोनाच्या नव्या रुग्ण संख्येत घट, वाचा 24 तासांतील आकडेवारी

पूनावाला यांनी सांगितले की, आम्ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (Indian Council of Medical Research - ICMR) यांच्यासमवेत भारतातील हजारो रुग्णांवर या लसीची चाचणी करणार आहोत. मला खात्री आहे की लशीची चाचणी यशस्वी होईल. यापूर्वी पूनावाला म्हणाले होते की, ऑगस्टच्या अखेरीस आम्ही मुंबई आणि पुण्यातील 5000 हजार लोकांवर या लसीची चाचणी घेऊ. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हायरस लसच्या 100 कोटी डोसच्या उत्पादनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन (Bill and Melinda Gates Foundation) आणि गवी (Gavi) यांच्याशी करार केला आहे.

वाचा-सावधान! WHOने कोरोनाबाबत दिला नवा इशारा, धोका आणखी वाढण्याची शक्यता

याअंतर्गत कंपनी भारतासह इतर गरीब आणि विकसनशील देशांना कोरोना विषाणूच्या लसचा एक डोस 225 रुपयांत देईल. कंपनी कोविशिल्ड (Covishield) आणि नोव्हाव्हॅक्स (Novavax) या नावाने कोरोना विषाणूची लस भारतात दाखल करणार आहे.

वाचा-देशातल्या शाळा केव्हा सुरु होणार? दिल्लीतल्या बैठकीनंतर नवी माहिती आली समोर!

21 हून अधिक लशीची क्लिनिकल ट्रायल सुरू

कोरोना व्हायरस लस विकसित करण्यासाठी 200 हून अधिक कंपन्या काम करत आहेत. यातील 21 पेक्षा जास्त लसी क्लिनिकल चाचण्यांमध्ये आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनावर तयार केलेली लसदेखील यापैकी एक आहे. ही लस मानवी चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. भारतात, ते कोविशिल्ड या नावाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सुरू करणार आहेत. ही लस लवकरच जनतेसाठी उपलब्ध होईल, असा कंपनीचा दावा आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाव्यतिरिक्त, कंपनी नोव्हावाक्स लस देखील तयार करेल.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india