मोठा दिलासा! 10 दिवसांनंतर कोरोनाच्या नव्या रुग्ण संख्येत घट, वाचा 24 तासांतील आकडेवारी

मोठा दिलासा! 10 दिवसांनंतर कोरोनाच्या नव्या रुग्ण संख्येत घट, वाचा 24 तासांतील आकडेवारी

देशात केवळ 28.21 टक्के अॅक्टीवेट केसेस असून 69. 80 टक्के रिकव्हरी रेट आहे.

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : देशात 9 दिवसांनंतर आज कोरोनाचे नवीन कमी रुग्ण सापडले आहेत. गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये 60 हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण प्रत्येक दिवसाला सापडत होते. तर 24 तासात साधारण 1000 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हे प्रमाण आज कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 53 हजार 601 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 22 लाख 68 हजार 675 वर पोहोचला आहे. याशिवाय कोरोनामुळे 871 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत हा आकडा 45 हजार 257 वर पोहोचला आहे. देशात सध्या 6 लाख 39 हजार 929 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हे वाचा-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटर सपोर्टवर, सर्जरीपूर्वीच कोरोनाची लागण

गेल्या अनेक दिवसांपासून 24 तासाला जी धक्कादायक आकडेवारी समोर येत होती त्याचं प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात 15 लाख 83 हजार 490 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. देशात केवळ 28.21 टक्के अॅक्टीवेट केसेस असून 69. 80 टक्के रिकव्हरी रेट आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.

हे वाचा-खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली, 6 दिवसांपासून सुरू आहे कोरोनावर उपचार

जगभरात काय आहे कोरोनाची स्थिती

जगभरात कोरोनाचा (coronavirus) प्रसार सुरूच आहे. आतापर्यंत 1 कोटी 97 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, सात लाख 28 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत सध्या 1 लाख 65 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि ब्रिटननंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. मात्र सर्वाधिक लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात अमेरिका पहिला तर भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 11, 2020, 9:55 AM IST

ताज्या बातम्या