मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Vaccine: रशियाने लस तयार केली पण तरी लागणार भारताची मदत

Corona Vaccine: रशियाने लस तयार केली पण तरी लागणार भारताची मदत

हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

रशिया तब्बल 40,000 लोकांना ही लस देणार आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी सुरू असलेल्या लशींच्या स्पर्धेत रशियानं पहिला नंबर लावला. मात्र जगभरात रशियाच्या लशीवर मात्र सवाल उपस्थित केले जात आहेत. भारतानं मात्र यापूर्वी रशियाच्या लशीच्या उत्पादनात स्वारस्य असल्याचं सांगितलं होतं. यासंदर्भात भारताकडून (Russian Direct Investment Fund) रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चाही सुरू होती. भारतासोबत लशीच्या उत्पादनासंदर्भात करार करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती RDIF चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दमित्रिएव यांनी दिली. पुतीन यांनी जगातील पहिली लस रशियानं तयार केली अशी घोषणा केली ही लस अत्यंत प्रभावी आणि रोग प्रतिकारकशक्ती वाढवणारी असल्याचा दावा पुतीन यांनी केला आहे. हे वाचा-Corona ला हरवण्यात मुंबईकरांना यश, पालिकेने दिली आनंदाची बातमी स्पुतनिक व्ही (Sputnik V) या लशीचं सुरुवातीचे ट्रायल यशस्वी झालं असून ही लस सुरक्षित असल्याचा दावा रशियाने केला आहे. रशिया तब्बल 40,000 लोकांना ही लस देणार आहे. इतक्या लोकांवर चाचणी करणार आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे. रशियान न्यूज एजन्सी TASS हे लशीच्या उत्पादकांनी गुरुवारी ही माहिती दिल्याचं सांगितलं. हैद्रबादमधील बायोलॉजिकल ई (BE) कंपनीनं यासंदर्भात नुकताच एक करार केला. येत्या काळात या चार कंपन्यांच्या लशीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार बायोलॉजिकल ई (BE) आणि जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीचा या संदर्भात नुकताच एक करार झाला आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीनं तयार केलेल्या लशीच्या मानवी चाचणीतील दुसरा टप्पा सुरू आहे. भारतात सुरू आहे तीन लशींचं परीक्षण देशात तीन लशींवर सध्या काम सुरू आहे. यापैकी दोन देशात तयार करण्यात आलेल्या भारत बायोटेक आणि झेडस कॅडिला यांनी बनविली आहे. तर एक ऑक्सफोर्ड विद्यापीठानं तयार केलेली आहे. ज्यामध्ये भारतातील सीरम इन्स्टिट्यूटशी भागीदारी केली आहे.
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या