नवी दिल्ली, 1 जानेवारी : कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) सावटातच जगभरात नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. एकामागोमाग एक कोरोनाचे नवीन प्रकार (covid 19 variant) येत असल्याने ही महामारी संपणार कधी? असाच प्रश्न जगभरातील सर्वांना पडला आहे. याचं आशादायी उत्तर आता समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रमुख टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी आशा व्यक्त केली आहे की 2022 हे कोविड-19 साथीच्या रोगाच्या समाप्तीचे वर्ष असू शकते. मात्र, त्यासाठी त्यांनी एक अटही सांगतली आहे. अट अशी आहे, की सर्व देशांनी या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी काम केलं पाहिजे.
बीबीसीच्या म्हणण्यानुसार, डब्ल्यूएचओ प्रमुखांनी नववर्षानिमित्त जारी केलेल्या त्यांच्या संदेशात 'संकुचित राष्ट्रवाद' आणि त्यामुळे लसींची (vaccine) साठेबाजी होण्याबाबतही इशारा दिला होता. चीनमध्ये न्यूमोनियाशी साध्यर्म असलेल्या अशाच प्रकारच्या (Covid-19) पहिल्या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर दोन वर्षांनी गेब्रेयस यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले की, लसींच्या वितरणात मोठी तफावत दिसत आहे. त्यामुळे व्हायरसला त्याचे स्वरूप बदलून पसरण्याची संधी मिळत आहे.
राज्यात 10 मंत्री, 20 आमदारांना Corona; लग्नसोहळे अन् नेते ठरतायत सुपर स्प्रेडर
'काही देश संकुचित राष्ट्रवादाचे बळी आहेत'
WHO प्रमुखांच्या मते, 'काही देश संकुचित राष्ट्रवादाला बळी पडले आहेत. त्यामुळे ते कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा करत आहेत. परिणामी जिथे लसीची (vaccine) सर्वात जास्त गरज आहे, तिथे ती पोहोचत नाही किंवा अगदी कमी प्रमाणात पोहोचत आहे. या परिस्थितीमुळे कोविड-19 च्या ओमिक्रॉन (omicron) प्रकाराची भरभराट आणि प्रसार होण्यासाठी सर्व अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. पण जर आपण लस वितरणातील असमानता दूर केली तर महामारीही संपवण्यात आपण यशस्वी होऊ.
florona | फ्लोरोना संसर्ग म्हणजे काय? तो किती धोकादायक आहे?
विशेष म्हणजे, गेल्या 24 तासांत भारतात कोविड-19 चे 22,775 रुग्ण आढळले आहेत. तर 406 लोकांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. यासह कोविड -19 मुळे एकूण मृत्यूंची संख्या 4 लाख 81 हजार 486 इतकी झाली आहे. कोरोनाचे एकूण सक्रिय रुग्णही 1 लाख 4 हजार 781 वर पोहोचले आहेत. संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी हे प्रमाण 0.30% आहे. दरम्यान, ओमिक्रॉन संसर्गाच्या प्रकरणांची संख्या 1,431 वर पोहोचली आहे. त्यापैकी 488 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील एकूण 23 राज्यांमध्ये ओमिक्रॉन संसर्ग पोहोचला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona updates, Pandemic