एका डेटसाठी पठ्ठ्यानं अख्खं रेस्टॉरंटचं घेतलं भाड्यानं, गर्लफ्रेंडला 2 वर्षांनंतर कळलं सत्य

एका डेटसाठी पठ्ठ्यानं अख्खं रेस्टॉरंटचं घेतलं भाड्यानं, गर्लफ्रेंडला 2 वर्षांनंतर कळलं सत्य

नायजेरियन प्रिन्स त्या महिलेच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आपली बिजनेस मिटिंग सोडून चक्क या महिलेशी बोलण्यास प्राधान्य दिलं. केशा नावाच्या या महिलेशी बातचीत केल्यानंतर, दोघांनी एका रेस्टॉरंटमध्ये डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. नायजेरियन प्रिन्सला ही त्यांची पहिली डेट अतिशय खास करायची होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : अनेकांनी आपल्या प्रेमासाठी, डेटवर जाण्यासाठी अनेक गोष्टी केल्याचं एकलं आहे. पण एका गर्लफ्रेंडला डेटनंतर तब्बल दोन वर्षांनी त्या मुलाबद्दल काहीशी धक्कादायक, काहीशी सुखद गोष्ट समजली. एका नाजेरियन प्रिन्सने आपल्या पहिल्या डेटसाठी संपूर्ण रेस्टॉरंटचं भाड्याने घेतलं होतं. नायजेरियाचे हे प्रिन्स १६ वर्षांपूर्वी अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीमध्ये आपल्या बिजनेसच्या कामासाठी पोहचले होते. त्यावेळी त्यांची एका महिलेशी ओळख झाली, जी आपल्या मॉडेलिंग कॉलसाठी वाट पाहत होती.

त्यावेळी नायजेरियन प्रिन्स त्या महिलेच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आपली बिजनेस मिटिंग सोडून चक्क या महिलेशी बोलण्यास प्राधान्य दिलं. केशा नावाच्या या महिलेशी बातचीत केल्यानंतर, दोघांनी एका रेस्टॉरंटमध्ये डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. नायजेरियन प्रिन्सला ही त्यांची पहिली डेट अतिशय खास करायची होती. त्यासाठी त्यांनी आपल्या डेटसाठी संपूर्ण रेस्टॉरंटचं भाड्याने घेतलं.

रेस्टॉरंट मालकाने अशाप्रकारे रेस्टॉरंट बुक करण्यासाठी अधिक पैसे लागतील असं सांगितलं. परंतु त्या प्रिन्सने त्यांना कितीही पैसे लागले तरी चालतील असं म्हणत, रेस्टॉरंट संपूर्ण गुलाबाच्या पाकळ्यांनी आणि रोमॅन्टिक अंदाजात सजवण्यास सांगितलं. त्यांना ही डेट दोघांसाठीही अतिशय खास करायची होती.

नायजेरियन प्रिन्सच्या आईने सांगितलं सत्य -

आपण डेट करत असलेला व्यक्ती प्रिन्स आहे, याबाबत केशाला जराही कल्पना नव्हती. डेटिंगच्या दोन वर्षांनंतर केशा नाजेरियन प्रिन्सच्या आईला भेटायला गेली, त्यावेळी त्यांच्या आईने केशाला या प्रिन्सबाबत सांगितलं. हे ऐकल्यानंतर केशा पूर्णपणे हैराण होती. त्यानंतर २०१६ मध्ये दोघे न्यूयॉर्कमध्ये विवाहबद्ध झाले. हे दोघे आता लंडन आणि नायजेरियामध्ये वास्तव्य करतात. या दोघांची ही लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: November 13, 2020, 1:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading