जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Covid 19 Updates: 'या' राज्यात आढळला Corona च्या XE व्हेरिएंटची लागण झालेला रुग्ण

Covid 19 Updates: 'या' राज्यात आढळला Corona च्या XE व्हेरिएंटची लागण झालेला रुग्ण

राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. अशातच राज्यात बी.ए. 4 चे 3 आणि बी.ए. 5 व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळला आहे.

राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. अशातच राज्यात बी.ए. 4 चे 3 आणि बी.ए. 5 व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळला आहे.

कोरोना व्हायरसनं (corona virus) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट XE मुळे सर्वांनाच धडकी (New variant of Corona XE) भरली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गुजरात, 09 एप्रिल: कोरोना व्हायरसनं (corona virus) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट XE मुळे सर्वांनाच धडकी (New variant of Corona XE) भरली आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XE नं गुजरातमध्ये एन्ट्री केली आहे. तेथे या नवीन व्हेरिएंटच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. यापूर्वी मायानगरी मुंबईतही या व्हेरिएंटचं प्रकरण आढळून आलं होतं. हा व्हायरस अत्यंत संसर्गजन्य मानला जात आहे, त्यामुळे सरकारही पूर्ण खबरदारी घेत आहे. गुजरातमध्ये समोर आलेल्या प्रकरणाबाबत असं सांगण्यात आलं की, 13 मार्च रोजी ती व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आढळली. पण आठवडाभरानंतर त्यांची प्रकृती ठीक होती. मात्र जेव्हा नमुन्याचे निकाल आले तेव्हा ती व्यक्ती XE व्हेरिएंटनं संक्रमित असल्याचं निष्पन्न झालं. आता चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट सर्वात संसर्गजन्य असल्याचं बोललं जात आहे. XE प्रकार BA.2 प्रकारापेक्षा 10 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. दोन ठिकाणी दहशतवादी-सुरक्षा दलात चकमक, अनेक भागात इंटरनेट सेवा ठप्प   प्राथमिक संशोधनानंतर असं सांगण्यात येत आहे की, XE प्रकार हे Omicron चा सब व्हेरिएंट आहे. आतापर्यंत ते अधिक धोकादायक सांगितलं जात नसलं तरी ते वेगाने पसरू शकते असं सांगितलं जात आहे. आतापर्यंत नोंदवलेल्या XE व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे सरकार आता घाबरू नका, असं आवाहन करत आहे. तज्ज्ञ काय म्हणतात? जॉन्स हॉपकिन्स येथील गुप्ता-क्लिंस्की इंडिया इन्स्टिट्यूटनं आयोजित केलेल्या पॅनेल चर्चेत वायरोलॉजिस्ट (विषाणूशास्त्रज्ञ) गगनदीप कांग म्हणाले, लोक आता प्रवास करत असल्यामुळे व्हेरिएंट उदया येतील. आम्हाला XE व्हेरिएंटबद्दल जेवढे माहित झालं आहे, ते चिंतेचे कारण नाही. आम्ही BA.2 बद्दल काळजीत होतो, पण BA.1 पेक्षा जास्त गंभीर नाही. XE व्हेरिएंट देखील BA.1 किंवा BA.2 (ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट) पेक्षा अधिक गंभीर रोग होत नाही. तर दुसरीकडे काही तज्ज्ञ म्हणत आहेत की, कोरोनाचे नवीन व्हेरिएंट देखील देशात नवीन लाट आणू शकतात. फरक एवढाच असू शकतो की, ते फारसे घातक ठरणार नाही आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही. देशात कोरोनाची तिसरी लाट आली असतानाही परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि दुसऱ्या लाटेसारखा विध्वंस होताना दिसत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात