नवी दिल्ली, 16 जुलै : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील लस (corona vaccine) तयार करण्यासाठी जुटलेत. बहुतेक देशांच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्यात. तर काही देश मानवी चाचण्यांच्या टप्प्यात आहेत. भारताही दोन औषध कंपन्यांच्या लशींना ह्युमन ट्रायलची परवानगी मिळाली आहे. एका लशीचं ह्युमन ट्रायल सुरूदेखील झालं. दरम्यान कोरोनावरील लस तयार झाली तर फक्त स्वत:पुरतीच नव्हे तर संपूर्ण जगाला लस पुरवण्याची क्षमता भारताकडे आहे, असा विश्वास मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (bill gates) यांनी दाखवला आहे.
लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, कोविड-19: इंडिया वॉर अगेन्स द व्हायरस या डॉक्युमेंटरीमध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सहप्रमुख आणि ट्रस्टी बिल गेट्स यांनी भारताबाबत असा विश्वास दाखवला आहे. तसंच आपली भरमसाठ लोकसंख्या आणि शहरी केंद्र यामुळे आरोग्य संकटाच्या मोठ्या आव्हानाचा सामना भारताला करावा लागतो आहे, असंही ते म्हणालेत.
बिल गेट्स म्हणाले, "भारतामध्ये खूप क्षमता आहे. इथल्या औषध आणि लस कंपन्या संपूर्ण जगाला मोठ्या संख्येनं पुरवठा करतात. सर्वात जास्त लशी भारतातच तयार करण्यात आल्या आहेत. भारतील औषध आणि लस कंपन्या संपूर्ण जगाला मोठ्या प्रमाणात लशीचा पुरवठा करतात. सीरम इन्सिट्युसारख्या मोठ्या कंपनीप्रमाणेच बायो ई, भारत बायोटेकसह कित्येक कंपन्या कोरोनावरील लस बनवण्यात मदत करत आहेत"
हे वाचा - मोठी बातमी! देशात पहिल्यांदा COVAXIN चं ह्युमन ट्रायल; तरुणाला दिला पहिला डोस
"या कंपन्या फक्त स्वत:च्या देशापुरतं नाही तर संपूर्ण जगासाठी लस निर्माण करतील याबाबत मी उत्सुक आहे. मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी आजाराविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणं खूप गरजेचं आहे", असं ते म्हणाले.
बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनची सरकारसह भागीदारीही आहे विशेषत डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, इंडियनकाऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि काही प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांसह काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine