मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

भारत, अमेरिका नाही तर 'या' देशाने लावला नंबर, पुढील आठवड्यात आणणार कोरोनाची लस?

भारत, अमेरिका नाही तर 'या' देशाने लावला नंबर, पुढील आठवड्यात आणणार कोरोनाची लस?

जगभरात आतापर्यंत 6 लशींची वेगवेगळ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे.

जगभरात आतापर्यंत 6 लशींची वेगवेगळ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे.

जगभरात आतापर्यंत 6 लशींची वेगवेगळ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 07 ऑगस्ट : जगभरात कोरोनाचा वाढता कहर आणि रोजची धक्कादायक आकडेवारी यामुळे सगळ्यांचं लक्ष कोरोनाच्या लशीवर लागलं आहे. जगभरात आतापर्यंत 6 लशींची वेगवेगळ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे. तर 2021पर्यंत लस येईल असा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे. दुसरीकडे रशियाकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी रशियाच्या लशीची चाचणी पूर्ण झाली असून 10 ऑगस्टपर्यंत लस येऊ शकते असा दावा केला आहे. गामालेया संस्थेनं तयार केलेल्या लशीची चाचणी पूर्ण झाली असून येत्या 3 दिवसांत ती बाजारात उपलब्ध होऊ शकते असा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय आणखीन दोन कंपन्यांनी लशीची चाचणी करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडे परवानगी मागितली आहे.

स्पुतनिक न्यूज डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तामुसार कोरोनाच्या लशीची चाचणी पूर्ण करण्यात आली असून ती लवकरच बाजारात उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती रशियाच्या आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी दिली आहे.

हे वाचा-एका दिवसात 62 हजारहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण, वाचा धक्कादायक आकडेवारी

गामालेया संस्थेतील वैज्ञानिकांनी ऑगस्टपर्यंत लस येईल असा दावा केला होता. त्यानुसार त्यांनी कोरोनाच्या लशीच्या चाचणीचे टप्पे पूर्ण केले असून लवकरच बाजारात उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्नशील आहेत. ही लस सर्वात पहिल्यांना कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्यांना दिली जाणार आहे.

रशियानं या लशीच्या झालेल्या चाचण्यांबाबत अद्याप कोणताही डेटा अथवा माहिती प्रकाशित केली नाही किंवा दिल्याची माहिती समोर आली नाही. त्यामुळे चाचण्या अर्धवट केल्याचा प्रश्नही रशियाच्या लशीवर उपस्थित केला जात आहे.

भारतात गेल्या 9 दिवसांत जवळपास 50 हजारहून अधिक रोज नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद केली जात आहे. आज मात्र गेल्या अनेक दिवसांमधील सर्वात धक्कादायक आणि रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर आली आहे.

हे वाचा-कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नैराश्यात गेला तरुण, कोविड सेंटरमध्येच घेतला गळफास

देशभरात 24 तासात 62 हजार 538 नवीन कोरोनाग्रतांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंतचा आकडा 20 लाख 27 हजार 074 वर पोहोचला आहे. बुधवारी 56 हजार 282 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर कोरोनामुळे 24 तासांत 904 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Coronavirus symptoms, Vaccine