Good News! 24 तासांत नवीन रुग्णांपेक्षा निरोगी रुग्णांची संख्या जास्त, वाचा लेटेस्ट आकडेवारी

Good News! 24 तासांत नवीन रुग्णांपेक्षा निरोगी रुग्णांची संख्या जास्त, वाचा लेटेस्ट आकडेवारी

मात्र दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या ही नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : भारतात कोरोनाव्हायरस (Covid-19 Infected) संक्रमितांची संख्या आता 61 लाख 45 हजार 292 झाली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या ही नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. 24 तासांत देशात 70 हजार 589 नवीन रुग्ण आढळून आले. तर, 85 हजार 194 रुग्ण निरोगी झाले.

दुसरीकडे कोरोना संक्रमितांमध्ये 60 लाखांचा आकडा पार करणारा भारत हा जगातला दुसरा देश आहे. भारताआधी अमेरिकेनं हा आकडा पार केला होता. तर, 24 तासांत देशात 776 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या आता 96 हजार 318 झाली आहे. तर, आतापर्यंत 51 लाख 1 हजार 398 रुग्ण रिकव्हर झाले आहेत. सध्या देशात 9 लाख 47 हजार 576 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

वाचा-लवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला

वाचा-कापडी, सर्जिकल की N95; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोणता मास्क चांगला?

भारत जगातील सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशांमध्ये आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, सर्वात जास्त मृतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, भारतात दुसऱ्या क्रमांकाचे अॅक्टिव्ह केसेस आहेत. मात्र दिलासादायक बाब म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 82.74% झाला आहे.

वाचा-कोरोनात संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, कामबंद आंदोलन सुरू

जगभरात काय आहे परिस्थिती

गेल्या 24 तासांत जगात 2 लाख 28 हजार नवीन प्रकरणं समोर आली. तर, 2 लाख 36 हजार रुग्ण निरोगी झाले आहेत. 3 हजार 780 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरनुसार जगभरात आता 3 कोटी 35 लाख रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी 10 लाख 6 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 29, 2020, 9:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading