• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • शाळा सुरू होताच झाला कोरोनाचा विस्फोट! 'या' राज्यात 575 विद्यार्थी, 829 शिक्षक पॉझिटिव्ह

शाळा सुरू होताच झाला कोरोनाचा विस्फोट! 'या' राज्यात 575 विद्यार्थी, 829 शिक्षक पॉझिटिव्ह

शाळांचे सॅनिटायजेशन बंधनकारक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळांचं सॅनिटायजेशन बंधनकारक करण्यात आलं आहे.

शाळांचे सॅनिटायजेशन बंधनकारक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळांचं सॅनिटायजेशन बंधनकारक करण्यात आलं आहे.

आंध्र प्रदेश राज्यात नववी आणि दहावीचे वर्ग 2 नोव्हेंबरपासून खुले करण्यात आले. त्यानंतर तीन दिवसांतच 575 विद्यार्थी, 829 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 • Share this:
  हैदराबाद, 06 नोव्हेंबर : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. असे असले तरी देशातील काही राज्यांमधील परिस्थिती अजूनही सुधारली नाही आहे. अशा परिस्थितीतही काही राज्यांनी शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे, मात्र याचे भयंकर परिणाम आता समोर आले आहेत. आंध्र प्रदेश राज्यात नववी आणि दहावीचे वर्ग 2 नोव्हेंबरपासून खुले करण्यात आले. त्यानंतर तीन दिवसांतच 575 विद्यार्थी, 829 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शालेय शिक्षण आयुक्त व्ही. चिन्ना वीरभद्रदू म्हणाले की, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत संक्रमित विद्यार्थ्यांची संख्या चिंताजनक नाही आहे, शाळा सुरू करण्यासाठी सर्व सुरक्षा मानदंडांचे पालन करण्यासाठी प्रत्येक संस्थेत शक्य ती पाऊल उचलले जात आहेत. आतापर्यंत 70 हजार 790 शिक्षक आणि 95 हजार 763 विद्यार्थ्यांची RT-PCR चाचणी करण्यात आली आहेत. वाचा-मेड इन इंडिया कोरोना लशीबाबत खूशखबर; मोदी सरकार COVAXIN लाँच करण्याच्या तयारीत शाळा सुरू झाल्यापासून आंध्र प्रदेशमध्ये 4 नोव्हेंबरपर्यंत सुमारे चार लाख विद्यार्थी शाळेत पोहोचले. शाळेत गेल्यामुळेच विद्यार्थ्यांना संसर्ग झाला असावा, असे सांगू शकत नाही. सध्या प्रत्येक वर्गात फक्त 15 किंवा 16 विद्यार्थी उपस्थित आहेत. ही चिंतेची बाब नाही. विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 9.75 लाख विद्यार्थ्यांनी नववी आणि दहावीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 3.93 लाख विद्यार्थी शाळेत आले. एकूण 1.11 लाख शिक्षकांपैकी 99 हजारहून अधिक शिक्षक शाळेत येत आहेत. वाचा-यंदा अशी साजरी करा ‘दिवाळी’, कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने सांगितले 5 नियम 'मुलांचे शिक्षण थांबणे जास्त धोकादायक' वीरभद्रदू म्हणाले, शाळा बंद झाल्याने गरीब विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास झाला आहे कारण ऑनलाइन वर्ग त्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. शाळा बंद झाल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील मुलींच्या विद्यार्थ्यांनाही याचा परिणाम होणार आहे, कारण त्यांचे शिक्षण नसेल तर त्यांचे पालक त्यांचे बालविवाहही लावून देतील. सध्या आंध्र प्रदेशात नववी, दहावी आणि इंटरमिजिएट वर्गातील सर्व सरकारी शाळा व महाविद्यालये पुन्हा आहेत. हे वर्ग आलटून पालटून अर्ध्या दिवसासाठी घेतले जातात.
  Published by:Priyanka Gawde
  First published: