नवी दिल्ली, 18 मे : भारतात (India) कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झालेल्या रुग्णांची संख्या जितक्या झपाट्याने वाढते आहेत, त्याचप्रमाणे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 36,823 रुग्ण बरे झालेत. देशात कोरोना रिकव्हरी रेट (corona recovery rate) म्हणजे कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 38.29 टक्के झाला आहे. मात्र आता या बऱ्या झालेल्या रुग्णांबाबतही चिंता वाढली आहे, कारण चीनमध्ये (china) कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना गंभीर समस्यांचा सामना करावो लागतो आहे. या रुग्णांचे अवयव खराब झालेत, शिवाय त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी नव्या गाइडलाइन्स जारी केल्यात. हे वाचा - Coronavirus जगात भारताचं चित्र दिलासादायक पण; महाराष्ट्राचं तितकंच भयानक चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोरोनाव्हायरसवर मात केलेल्या रुग्णांचं फुफ्फुस आणि हृदय खराब होतं असल्यानं त्यांना उपचाराची गरज भासू शकते. कोरोना रुग्णांमध्ये एनिजीना (Anigina) किंवा एरिथाइमिया (Arrythymia) यासारख्या हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. थेट व्हायरसमुळे किंवा भरपूर कालावधीसाठी बेडवर राहिल्यानंतर असं होऊ शकतं. या रुग्णांच्या मांसपेशींना हानी पोहोचते आहे आणि मानसिक समस्याही बळावत आहेत. यामध्ये डिप्रेशन, झोप न लागणं या समस्यांचा समावेश आहे. हे वाचा - Work from Home, आणखी एका समस्येला निमंत्रण; सत्या नडेला यांनी व्यक्त केली चिंता गंभीर रुग्णांचीच अशी अवस्था झाली आहे. ज्या रुग्णांमध्ये सौम्य किंवा मध्यम लक्षणं आहेत, त्यांच्यावर असा परिणाम दिसून आला नाही, असंही आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांच्या अवयवांवर परिणाम होतो आहे, त्यामुळे या समस्यांना दीर्घकाळ राहणाऱ्या समस्यांच्या श्रेणीत ठेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.