मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

8 सेकंदांसाठी मोडला क्वारंटाइनचा नियम, भरावा लागला 2.57 लाख रुपये दंड

8 सेकंदांसाठी मोडला क्वारंटाइनचा नियम, भरावा लागला 2.57 लाख रुपये दंड

आपल्याकडे Coronavirus ला रोखण्याचे रग्गड नियम आहेत, पण मास्क गळ्यापाशी ठेवून फिरणारेच अधिक दिसतात.  पण असेही काही प्रदेश आहेत जिथे कोरोना नियमांचा काटेकोरपणे अवलंब होतो.

आपल्याकडे Coronavirus ला रोखण्याचे रग्गड नियम आहेत, पण मास्क गळ्यापाशी ठेवून फिरणारेच अधिक दिसतात. पण असेही काही प्रदेश आहेत जिथे कोरोना नियमांचा काटेकोरपणे अवलंब होतो.

आपल्याकडे Coronavirus ला रोखण्याचे रग्गड नियम आहेत, पण मास्क गळ्यापाशी ठेवून फिरणारेच अधिक दिसतात. पण असेही काही प्रदेश आहेत जिथे कोरोना नियमांचा काटेकोरपणे अवलंब होतो.

  • Published by:  News18 Desk

तैपई, 10 डिसेंबर : आपल्याकडे मास्क वापरणं, सार्वजनिक ठिकाणी न थुकणं वगैरे नियम तर चिक्कार आहेत. पण आत्ता जरी बाहेर पडाल तरी मास्क गळ्यात अडकवून किंवा नाकाखाली घेऊन किंवा अजिबान न घालता बाहेर पडणाऱ्यांची संख्या व्यवस्थित मास्क लावणाऱ्यांपेक्षा अधिक दिसेल. मास्क खाली करून बिनदिक्कत रस्त्यात थुंकणारेही दिसतील कदाचित. कारण आपल्याकडे नियम आहेत, पण अंमलबजावणीची वानवा आहे. नियम पाळायची मानसिकताच नाही. पण असाही एक देश आहे, जिथे कोविडचे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळले जातात. जराशी चूकभूलसुद्धा माफ केली जात नाही.

तैवानमध्ये (Taiwan) कोरोनाचा (Covid 19) प्रसार रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या सुरक्षिततेच्या नियमांची अगदी काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. नियम जराजरी मोडला तरी भरभक्कम दंड भरावा लागतो. नुकताच एका नागरिकाला याचा अनुभव आला. त्याला नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल थोडाथोडका नव्हे तर तब्बल 3500 डॉलर्स म्हणजे 2 लाख 57 हजार 495 रुपये दंड भरावा लागला, तेही केवळ 8 सेकंदाच्या चुकीसाठी.

फिलिपाईन्समधून (phillipines) तैवानमध्ये (Taiwan) आलेला हा स्थलांतरीत कामगार असून (Migrant Worker From Phillippines) त्याला क्वाओसियुंग (Kaohsiung) शहरात एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये (Quarntine) राहण्यास सांगितलं होतं. त्याप्रमाणे रहात असताना, तो आपल्या खोलीतून बाहेर पडून हॉलपर्यंत गेला. ही घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत (CCTV) पकडली गेली. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही कव्हरेज पाहिलं , तेव्हा या व्यक्तीनं क्वारंटाईनचा नियम मोडल्याचं (Break The Rules of Corona Quarantine) स्पष्ट झालं. त्यांनी लगेच आरोग्य विभागाच्या (Health Department) अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी केलेल्या तपासात हा व्यक्ती दोषी आढळला. त्यामुळं या व्यक्तीला 1 लाख तैवानी डॉलर्स म्हणजेच 3500 अमेरिकी डॉलर्सचा दंड ठोठवण्यात आला. केवळ आठ सेकंदाची चूक या व्यक्तीला चांगलीच महागात पडली.

तैवानमध्ये का करण्यात आला कडक लॉकडाउन ?

तैवानमध्ये कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यामध्ये क्वारंटाईनचे नियमही अधिक कठोर आहेत. क्वारंटाईन असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला एक क्षणदेखील आपल्या खोलीतून बाहेर पडण्याची परवानगी नाही. कोणीही व्यक्ती हॉटेलमध्ये रहात असेल आणि आपण खोलीबाहेर पडलो तरी काही होणार नाही, काहीही दंड वगैरे लागणार नाही, असं वाटत असेल तर तो गैरसमज आहे, असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.

क्वाओसियुंग शहरातील हॉटेलमध्ये 56 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या हॉटेलात तीन हजार खोल्या आहेत. तैवानमध्ये कोविड 19 ची साथ रोखण्यासाठी जे उपाय केले जात आहेत, त्याची जगभरात प्रशंसा होत आहे. या साथीचा उद्रेक झाल्यावर लगेचच तैवानमध्ये लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यात कोणतीही ढिलाई करण्यात आलेली नाही.

जगभरात सध्या कोविड 19च्या साथीनं थैमान घातलं आहे. वेगवेगळ्या देशात वेगवेगळे उपाय केले जात आहेत. लॉकडाउन हा यातला एक महत्त्वाचा उपाय आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातल्या देशांनी या उपायाचा अवलंब केला आहे. तैवानसारखा छोटा देश अत्यंत जबाबदारीनं आणि काटेकोरपणे लॉकडाउनचा अवलंब करत आहे.

First published:

Tags: Coronavirus, Covid19, Lockdown, Taiwan